Beed Crime News :"बीडमध्ये भररस्त्यात गोळीबार;अनैतिक संबंधांचा भयंकर कट उघड!

बीड: बीडमध्ये मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास अंकुश नगर येथे जोरदार गोळ्याचा आवाज आला.. तेव्हा एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडुन व धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली.या घटनेमुळे बिड जिल्ह्यात जोरदार गोंधळ उडाला आहे.पोलासांच्या तपासात ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे..


नक्की घडलं तरी काय?


घटनेची सविस्तर माहिती अशी की, हर्षद उर्फ दादा शिंदे या मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अंकुश नगर भागातील एका नाल्याच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी आरोपी विशाल सूर्यवंशी तिथे आला आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. जीव वाचवण्यासाठी हर्षद पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. ह्या हल्ल्यामुळे हर्षद शिंदे जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे तेथील नागरिंकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे..


घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथकं रवाना केली आहेत. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी या हत्येमागे अनैतिक संबंधांचे कारण असण्याचा अंदाज वर्तवला आहे, परंतु नेमकं कारण आरोपी पकडल्यानंतरच स्पष्ट होईल.
भररस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे अंकुश नगर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा प्रभाव उरला आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणातील सर्व दुवे शोधून काढत असून, या हत्येमागील इतर सहभागींचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

Crime News : प्रियकरासाठी पत्नीनेच रचला पतीचा ‘डेथ प्लान’; ऑडिओ क्लिपमुळे......

जयपूर : राजस्थानमधील अलवर येथे पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बँक अधिकाऱ्याच्या

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

Vardha Crime News : वर्ध्यात लग्नाच्या वरातीत हत्याकांड; सक्खा काका आणि भाऊ....

वर्धा : आनंद, उत्साह आणि जल्लोषात सुरू असलेला लग्नसोहळा क्षणात शोकांतिकेत बदलल्याची धक्कादायक घटना वर्धा