मुंबई : लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. या नियमांत बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तरीही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
बुलढण्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या योजनेचा १९६ महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्या प्रकरणी चौकशी केली असता १९० कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरत आहेत.
उरलेल्या ६ शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत प्रत्येकी १६ हजार असे एकूण १९ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आले. या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.