महापौर, गटनेते, अध्यक्ष यांच्या दालनाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

येत्या १५ दिवसाच्या आत सर्व दालने सुस्थितीत करून ठेवा, असे दिले निर्देश


मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता येत्या १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडून दुसऱ्याच दिवशी मतमोजणीची प्रक्रियाही पार पडणार आहे. यानंतर महापालिका स्थापन होऊन महापौर तसेच वैधानिक आणि गटनेते तसेच विशेष समित्यांचे अध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महापौर आणि इतर समिती अध्यक्ष तसेच गटनेते यांच्या दालनाच्या डागडुजी कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीत फिरून घेतला. येत्या १५ दिवसाच्या आत कार्यालये यांची कामे आणि व्हरांडा याची कामे केली जावीत, तसेच व्हरांड्यात एक समान आसनांची व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.



मुंबई महापालिकेचा कार्यकाल ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात झाल्यानंतर ०८ मार्च २०२२ पासून महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तेव्हापासून महानगरपालिका आणि त्याअंतर्गत वैधानिक आणि विशेष समित्या अस्तित्वात नाहीत. परिणामी महापौर कार्यालय, विविध वैधानिक तसेच विशेष समिती अध्यक्ष कार्यालय, सभागृह नेते कार्यालय, विरोधी पक्षनेते कार्यालय इत्यादी विविध कार्यालये बंद आहेत. तसेच प्रशासकांच्या निर्देशानुसार सर्व महापालिका पक्ष कार्यालये सीलबंद करण्यात आली आहेत. तेव्हापासून जवळजवळ तीन वर्षे कार्यालयांना देखभालीअभावी दुरुवस्था झाली आहे. या कार्यालयांना वाळवी लागल्याने ही कार्यालये आता वापरण्याच्या स्थितीत नाहीत.


मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यासर्व दालनांसह कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वच दालनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाळवी लागून फर्निचर, दरवाजे, खिडक्या आणि इतर लाकडी सामान वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, मोठया प्रमाणात भिंतीवरील रंग उडल गेला आहे, भिंती-छत फरशीमध्येही भेगा पडणे, दरवाजा खिडक्यांच्या बिजागऱ्या तुटणे आदी प्रकारे कार्यालयांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर महापालिका स्थापन झाल्यानंतर महापौर,विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, विविध पक्ष कार्यालये तसेच वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्षांची दालने सुसज्ज ठेवण्याच्यादृष्टीकोनातून डागडुजीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी जे पी इन्फाप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली असून या डागडुजीच्या कामांसाठी विविध करांसह १.२२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.


आता प्रत्यक्षात निवडणूक प्रकिया सुरू झाली असून पुढील १५ दिवसांमध्ये महापौर आणि उपमहापौर विराजमान होवून, स्थायी, शिक्षण,सुधार आणि बेस्ट समिती यांचे अध्यक्ष निवड होऊन तेही विराजमान होतील. त्यामुळे त्यांची दालने सुस्थितीत असावीत आणि त्यादृष्टिकोनातून कामे केली जात आहेत का? जी कामे केली ती योग्य प्रकारे आहेत का? कोणत्या दालनाची कामे अपूर्ण आहेत याचा आढावा महापालिका सचिव मंजिरी देशपांडे आणि मुख्यालय इमारत देखभाल विभागाचे कार्यकारी अभियंता संजय आढाव यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली .



सभागृह नेत्याला दालन असतं का?


महापालिका आयुक्त सर्व दालनांची पाहणी करताना पहिल्या मजल्यावर सभागृह नेत्यांच्या दालनापर्यंत पोहोचले. तिथे सभागृह नेत्याच्या दालनाची पाटी वाचून इथे सभागृह नेत्याला सुद्धा दालन असतं का असा सवाल महापालिका सचिवांकडून माहिती जाणून घेतली.

Comments
Add Comment

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशा मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंतरिम प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी

गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचा खर्च वाढला

संजय गांधी उद्यानातील दुहेरी बोगद्याच्या पर्यायी कामांसाठी वाढला एक हजार कोटींचा खर्च मुंबई : गोरेगाव मुलुंड

मुंबई महापौर,उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ?

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

कमी दृश्यमानता ठरली अपघाताचे कारण ?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज म्हणजेच बुधवार २८

Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर मनोरंजन विश्वातिल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री