मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे आज आणि उद्या दोन दिवसांच्या विशेष मेगाब्लॉकमुळे विस्कळीत होणार आहे. महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने हा ब्लॉक घेतल्याने आठवड्याच्या पहिल्याच दोन दिवसांत मुंबईकरांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. या मेगाब्लॉकचा थेट परिणाम लोकलच्या नियमित फेऱ्यांवर झाला असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवर हा दोन दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे आज कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडणार आहे. या काळात शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात झाल्या असून, ज्या गाड्या सुरू आहेत त्या देखील १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या दोन दिवसांत अत्यंत आवश्यक असल्यासच रेल्वे प्रवास करावा.
मराठी भाषेतील पहिल्या 'दर्पण' वृत्तपत्राचे जनक आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत आज राज्यभरात 'मराठी पत्रकार दिन' ...
मेगाब्लॉक घेण्याचं कारण?
पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान ही नवीन मार्गिका सध्याच्या जलद (Fast Line) मार्गाला जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष तांत्रिक ब्लॉक जाहीर केला आहे. या कामामुळे मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत होणार असून एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी ही नवी लाईन अस्तित्वात असलेल्या ट्रॅकशी जोडणे अनिवार्य आहे. या तांत्रिक जोडणीसाठी रेल्वेने अप आणि डाऊन अशा दोन्ही जलद मार्गांसह पाचव्या मार्गिकेवरही वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जरी हे काम प्रामुख्याने मध्यरात्रीच्या सुमारास होणार असले, तरी त्याचा मोठा फटका पहाटेच्या आणि सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
असे असेल ब्लॉकचे वेळापत्रक
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉकचा कालावधी आणि रद्द होणाऱ्या फेऱ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
अप जलद मार्ग (Up Fast Line) : मंगळवारी मध्यरात्री १२:०० ते बुधवारी पहाटे ५:३० पर्यंत.
डाऊन जलद मार्ग (Down Fast Line) : मंगळवारी मध्यरात्री १:०० ते पहाटे ४:३० पर्यंत.
रद्द होणाऱ्या फेऱ्या : मंगळवारी ९३ तर बुधवारी १२२ अशा एकूण २१५ फेऱ्या रद्द राहतील.
मुंबईकरांच्या प्रवासाला 'ब्रेक'
आठवड्याच्या मधल्या दोन दिवसांतच लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचे नियोजन कोलमडणार आहे. विशेषतः पहाटे लांब पल्ल्याच्या गाड्या पकडणारे प्रवासी आणि सकाळी लवकर कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे हाल होणार आहेत. या तांत्रिक कामामुळे भविष्यात गाड्यांचा वेग आणि संख्या वाढण्यास मदत होणार असली, तरी सध्या मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका सुखद प्रवासाची पसंती असलेल्या एसी (AC) लोकल आणि १५ डब्यांच्या जलद लोकल प्रवाशांना बसणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे या महत्त्वाच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही पूर्णपणे ठप्प राहणार आहे. मात्र, दुसरीकडे नवीन वर्षाच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. कांदिवली-बोरिवली दरम्यानच्या कामामुळे जलद मार्गावरील प्रवाशांची लाडकी 'एसी लोकल' आणि गर्दीच्या वेळी आधार ठरणाऱ्या '१५ डब्यांच्या' गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत पाचव्या मार्गिकेवरही गाड्या धावणार नसल्याने, नियमित लोकलच्या वेळापत्रकात मोठी घसरण होऊन गाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावतील. यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांच्या कष्टांत भर पडणार आहे. एकीकडे लोकल प्रवाशांचे हाल होत असताना, रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवाशांची वाढती गर्दी आणि वेटिंग लिस्ट लक्षात घेऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे:
तेजस राजधानी (मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली) : या गाडीला एक जादा ३AC डबा जोडला असून, आता ही ट्रेन २२ डब्यांच्या क्षमतेसह धावेल.
स्वर्ण जयंती राजधानी (साबरमती ते नवी दिल्ली) : या गाडीलाही एक अतिरिक्त ३AC डबा जोडून ती २३ डब्यांची करण्यात आली आहे.
शताब्दी एक्स्प्रेस (मुंबई-अहमदाबाद) : प्रवाशांची वाढती संख्या पाहून या गाडीलाही अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.
रेल्वेच्या या दुहेरी निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असला तरी, आंतरराज्यीय प्रवाशांना मात्र हक्काची जागा मिळणे सोपे होणार आहे.