मनसेचे नाराज संतोष धुरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - मंत्री नितेश राणे यांनी घडवून आणली भेट

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसे मोठा धक्का बसला आहे. मनसेचे कट्टर नेते आणि वरळी विभागातील प्रमुख कार्यकर्ते संतोष धुरी यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्री नितेश राणे यांनी ही भेट घडवून आणली. प्रभाग क्रमांक १९४ मधून तिकीट न मिळाल्याने धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते.


प्रभाग क्रमांक १९२ आणि १९४ या दोन जागांवर उबाठा आणि मनसेत तिढा होता. अखेर या वादावर तोडगा काढत प्रभाग १९२ मनसेकडे राहिला, तर प्रभाग १९४ उबाठाला सोडण्यात आला. मात्र, प्रभाग क्रमांक १९४ मधून माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचा या क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय सहभाग आणि प्रभाव होता. परंतु जागावाटपात हा प्रभाग उबाठाला गेल्याने संतोष धुरी यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. या निर्णयानंतर संतोष धुरी काही काळ नॉट रिचेबल झाले होते.

Comments
Add Comment

अपघातावर राजकारण करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले

पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घाला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी होऊन सत्य समोर

महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना ममतांनी सुरू केले राजकारण, पवारांनी सुनावले

पुणे : तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अजित पवारांचे बुधवारी सकाळी बारामती

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशा मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंतरिम प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचा खर्च वाढला

संजय गांधी उद्यानातील दुहेरी बोगद्याच्या पर्यायी कामांसाठी वाढला एक हजार कोटींचा खर्च मुंबई : गोरेगाव मुलुंड

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार रिंगणात

पंचायत समितीची एक जागा बिनविरोध; ११७ जागांसाठी ३२९ उमेदवार रिंगणात अलिबाग  : रायगड जिल्हयातील ५९ जिल्हा परिषद गट