मोहित सोमण: आज महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) या एसयुव्ही कार स्पेशालिस्ट कंपनीने आज आक्रमक किंमतीत XUV 7XO कारची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १३.६६ लाखापासून (एक्स शोरूम किंमत) बाजारात येणार असल्याचे कंपनीने लाँच दरम्यान स्पष्ट केले. यापूर्वी कंपनीने XUB 700 बाजारात आणल्यावर संबंधित कार बाजारात लोकप्रिय ठरली होती. याच धर्तीवर नव्या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने बाजारातील स्पर्धा तीव्र करण्यासाठी या गाडीचे लाँचिंग बाजारात केले. नुकतीच या सेगमेंटमध्ये मारूतीने फ्रॉन्क्स, तसेच ह्युंदाईकडून व्हेन्यूच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. याच धर्तीवर कंपनीने पूर्वीच्या XUV 7XO या XUV 700 गाडीच्या नव्या आवृत्तीचे अनावरण केले आहे.
XUV 7XO, बेस व्हेरिएंटपासूनच चांगल्या सुविधांसह बाजारात येत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच या AX व्हेरिएंटमध्ये कोस्ट-टू-कोस्ट ३१.२४ सेमी ट्रिपल एचडी स्क्रीन, इंटेलिजेंट अँड्रेनॉक्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, ChatGPT सह कनेक्टेड अलेक्सा, क्रूझ कंट्रोल,पुश बटण स्टार्ट/स्टॉप आणि ७५ सुरक्षा वैशिष्ट्ये (Safety Featurs) या कारसह बाजारात येणार आहे. ही सर्व वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून उपलब्ध आहेत ज्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम वैशिष्ट्ये पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाली आहेत.
कारचे व्हेरिएंट आणि त्यांची किंमत-
व्हेरियंट आसन क्षमता पेट्रोल डिझेल पेट्रोल(G)/डिझेल(D)
मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AT) एक्सक्लुझिव्ह
AX ७ सीटर - गॅस १३.६६ लाख डिझेल: १४.९६ लाख
AX3 ७ सीटर - गॅस १६.०२ लाख डिझेल १६.४९ लाख
AX5 ७ सीटर- गॅस १७.५२ लाख डिझेल- १७.९९ लाख
AX7 ७ सीटर - गॅस १८.४८ लाख डिझेल -१८.९५ लाख
AX7T ७ सीटर डिझेल २०.९९ लाख ६ सीटर - डिझेल २१.३९ लाख ७ सीटर डिझेल - २२.१६ लाख
AX7L ७ सीटर - डिझेल २२.४७ लाख गॅस - २३.४५ लाख
६ सीटर - गॅस २३.६४ लाख, डिझेल २४.११ लाख
या पहिल्या ४००० ग्राहकांच्या डिलिव्हरीसाठी प्रास्ताविक किमती आहेत (अटी आणि शर्ती लागू) असेल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन १.४५ लाख अतिरिक्त किमतीत उपलब्ध आहे असे कंपनीने म्हटले. तसेचऑल व्हील ड्राइव्ह व्हेरियंट २.४५ लाख अतिरिक्त किमतीत उपलब्ध आहे.
डिलिव्हरीची वेळ काय असेल?
- AX7, AX7T, AX7L (प्री-बुक केलेल्या ग्राहकांपासून सुरुवात) – १४ जानेवारी २०२६
- AX, AX3, AX5 – एप्रिल २०२६ पासून सुरुवात
कारची आणखी फिचर्स -
एक्स्प्रेसिव डिझाईन - रत्नांसारख्या पंजाच्या आकाराच्या ॲक्सेंटसह पूर्ण-रुंदीची ग्रिल डीआरएलसह बाय-एलईडी प्रोजेक्टर
हेडलॅम्प, हिऱ्यापासून प्रेरित क्लिअर लेन्स एलईडी टेललॅम्प, R19 डायमंड कट
अलॉय व्हील्स आणि सुपर-प्रीमियम हाय-ग्लॉस पियानो-ब्लॅक फिनिश
एक्सपिरिंयशल टेक: कोस्ट-टू-कोस्ट (Coast to Coast) ३१.२४ सेमी ट्रिपल एचडी स्क्रीन, भारतातील पहिल्या डॉल्बी व्हिजन आणि ॲटमॉससह १६ स्पीकरची हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीम, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंगसह ५४०-डिग्री कॅमेरा, डायनॅमिक व्हिज्युअलायझेशनसह ADAS लेव्हल २, फ्रेमलेस इलेक्ट्रोक्रोमिक IRVM आणि रिव्हर्ससाठी ऑटो टिल्टसह मेमरी ORVM,अप्रोच अनलॉक आणि वॉक अवे लॉक फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग आणि स्टॅबिलायझर बारसह फ्रंट मॅकफर्सन स्ट्रट आणि मल्टी-लिंक रिअर इंडिपेंडेंट सस्पेंशन उत्कृष्ट राइड आणि हाताळणी प्रदान करते.
लक्झरी फिचर्स - चौथे बॉस मोडसह ६-वे पॉवर्ड सहचालक सीट, पुढील सीट आणि मागील व्हेंटिलेटेड सीट्स, BYOD, सेगमेंटमधील पहिल्या प्लश पॅड्ससह उच्च घनतेचा सीट फोम
२एल एमस्टॅलियन TGDi गॅसोलीन इंजिन आणि २.२एल एमहॉक टर्बो-डिझेल इंजिनचे पर्याय, डिझेलमध्ये सेगमेंटमधील पहिले ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) फिचर्ससह बाजारात उपलब्ध असणार आहे. १९४५ मध्ये स्थापन झालेला महिंद्रा समूह हा १०० हून अधिक देशांमध्ये ३२४००० कर्मचाऱ्यांसह कंपन्यांचा एक मोठा आणि सर्वाधिक प्रशंसित बहुराष्ट्रीय समूह आहे. भारतात शेती उपकरणे, युटिलिटी एसयूव्ही, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये प्रमुख प्रवाहातील कंपनी म्हणून कंपनीला ओळखली जाते. कंपनीचा अक्षय ऊर्जा, कृषी, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्येही सहभाग आहे. आज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये ०.८७% घसरण झाल्याने शेअर ३७८७ रूपयांवर बंद झाला आहे.