हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय २७) या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. निकिताचा मृतदेह ३ जानेवारी रोजी कोलंबिया येथील एका अपार्टमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. याप्रकरणी तिचा माजी रूममेट अर्जुन शर्मा (वय २६) हा मुख्य संशयित असून, निकिताची हत्या केल्यानंतर तो गुपचूप भारतात पळून आला होता. मात्र, इंटरपोलच्या मदतीने तमिळनाडू पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई : मनसेचे नेते संतोष धुरी यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोमवारी रात्री त्यांनी ...
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता आणि अर्जुन हे अमेरिकेत एकाच फ्लॅटमध्ये रूममेट म्हणून राहत होते. अर्जुनने निकिताकडून सुमारे ४,५०० डॉलर्स (जवळपास ४ लाख रुपये) उसने घेतले होते. निकिताने वारंवार पैसे परत मागितल्याने अर्जुनने तिला ३१ डिसेंबर रोजी पैसे नेण्यासाठी आपल्या घरी बोलावले. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात अर्जुनने निकितावर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात निकिताचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीची चलाखी आणि पलायन
निकिताची हत्या केल्यानंतर अर्जुनने स्वतःच २ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात जाऊन निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने हे नाटक केले आणि त्यानंतर लगेच वॉशिंग्टन विमानतळावरून भारताकडे जाणारे विमान पकडले. ३ जानेवारीला पोलिसांनी अर्जुनच्या घराची झडती घेतली असता, तिथे निकिताचा मृतदेह आढळून आला.
'तो बॉयफ्रेंड नव्हता' - वडिलांचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर काही माध्यमांमध्ये अर्जुन हा निकिताचा माजी प्रियकर (Ex-boyfriend) असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, निकिताचे वडील आनंद गोडिशला यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. "अर्जुन हा निकिताचा प्रियकर नव्हता, तर तो केवळ तिचा माजी रूममेट होता. पैशांच्या वादातून त्याने माझ्या मुलीचा जीव घेतला. माध्यमांनी चुकीच्या अफवा पसरवू नयेत," अशी विनंती त्यांनी केली आहे.
यशस्वी करिअर आणि स्वप्नांचा अंत
निकिता ही एक अत्यंत हुशार मुलगी होती. तिने बाल्टिमोर काउंटीमधील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधून मास्टर पदवी मिळवली होती. फेब्रुवारी २०२५ पासून ती 'व्हेडा हेल्थ'मध्ये कार्यरत होती आणि तिने अलीकडेच 'ऑल-इन अवॉर्ड' देखील पटकावला होता. २०२६ मध्ये नव्या जोमाने काम करण्याची तिची स्वप्ने होती, मात्र त्याआधीच क्रूरपणे तिचा अंत करण्यात आला.