डॉ लाल पॅथलॅब्सने 'सोवाका' या वेलनेस इंटिग्रेटेड केंद्राची स्थापना केली

मोहित सोमण: सध्या बाजारात एफएमसीजी, हेल्थेअर क्षेत्रातील जनजागृती होत असताना डॉ. लाल पॅथलॅब्सने (Dr Lal Path Labs Limited) कंपनीने विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्सनल केअर यांचे इंटिग्रेटेड व्यासपीठ सुरु करण्याचे ठरवले होते. याची पूर्तता म्हणून सोवाका (SOVAAKA) हे नेक्स्ट-जनरेशन वेलनेस सेंटर सुरू केले असल्याचे कंंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.भारतातील सर्वात विश्वसनीय डायग्नोस्टिक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या डॉ. लाल पॅथLलॅब्स लिमिटेडने आज गुरुग्राममध्ये आपले नवीन युगाचे डायग्नोस्टिक एक्सपिरियंस सेंटर सोवाका (Sovaaka) सुरू करण्याची घोषणा केली. कंपनीने फायलिंगमध्ये' स्पष्ट करताना हे केंद्र सुरु करण्यामागे आरोग्यामागील विज्ञान' या तत्त्वज्ञानाचा विचार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. कंपनीच्या माहितीनुसार, सोवाका प्रतिबंधात्मक आणि जीवनशैली आरोग्यसेवेमध्ये एक नवीन मानक (Standard) कायम राखते. कंपनीच्या या प्रगत आरोग्य उपक्रमाद्वारे, हे केंद्र अचूक निदान अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य एकत्र आणते, जेणेकरून व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर सक्रिय नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.


सोवाका एक अत्यंत पर्सनलाईज निदानावर आधारित आरोग्य सेवेची उपलब्धता करून देते असेही ब्रँडच्या वतीने कंपनीने स्पष्ट केले. नियमित आरोग्य तपासणीच्या पलीकडे डॉक्टरांनी डिझाइन केलेले कार्यक्रमाचा या एक्सपिरियंस सेंटरमध्ये समावेश आहे. यामध्ये कंपनीच्या माहितीनुसार एटरना (महिलांसाठी) आणि व्हिटा (पुरुषांसाठी) या घटनांचाही समावेश असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. व्यक्तीचे वय, लिंग आणि जीवनशैलीनुसार तयार हे उपाय तयार केले जातात.


मोठ्या संवेदनशील रक्त पॅनेल, अनुवांशिक चाचणी (Genetics Test) व एआय आधारित इमेजिंग आणि सातत्याने चालणाऱ्या डिजिटल आरोग्य नोंदी यांसारख्या प्रगत निदान पद्धती एकत्र कंपनी या ब्रँडिग मार्फत आणणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच छताखाली सगळ्या सुविधा गुरूग्राम स्थित सेंटर मधून मिळतील. संपूर्ण क्लिनिकल अहवाल मूल्यांकन आणि संबंधित अनुरूप पोषण मार्गदर्शनासह सोवाका एखाद्याच्या आरोग्याच्या आणि निरोगीपणाच्या प्रवासाची खरोखरच सर्वसमावेशक इनसाईट देते असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.


प्रसारमाध्यमांशी बोलताना,'रोगाचे निदान करण्यापासून ते रोगाचा अंदाज लावण्यापर्यंत सोवाका हे निदानाच्या उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा क्षण आहे' असे डॉ. लाल पॅथLलॅब्सचे कार्यकारी अध्यक्ष (मानद) ब्रिगेडियर डॉ. अरविंद लाल म्हणाले आहेत. यापुढे भाष्य करताना,'ज्या जगात असंसर्गजन्य रोग (NCDs) किंवा जीवनशैलीचे आजार लाखो लोकांना शांतपणे प्रभावित करत आहेत, तिथे विज्ञान-आधारित आरोग्य आणि लवकर तपासणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आज केलेली तपासणी खरोखरच उद्याचे रक्षण करू शकते. कमी-डोस सीटी, १.५टी एमआरआय, डेक्सा स्कॅनिंग, अनुवांशिक विश्लेषण आणि नियमित व प्रगत रक्त चाचण्यांच्या विस्तृत श्रेणीने सुसज्ज असलेले हे केंद्र जलद अहवाल, सर्वसमावेशक माहिती आणि अत्यंत वैयक्तिकृत मूल्यांकन अनुभव सुनिश्चित करते.'


यासह,'सोवाकाद्वारे, आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा कशी दिली जाते याची पुनर्कल्पना करत आहोत' असे डॉ लाल पॅथलॅब्सचे सीईओ शंखा बॅनर्जी म्हणाले आहेत. तसेच,निदान, प्रगत इमेजिंग आणि जीवनशैली आधारित कार्यक्रम एकाच छताखाली आणून आम्ही त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यामध्ये गुंतवणूक करण्यास वचनबद्ध असलेल्या व्यक्तींसाठी एक केंद्र तयार करत आहोत.'असेही ते पुढे म्हणाले आहेत.


हे लाँच अशा वेळी झाले आहे जेव्हा भारतात प्रतिबंधात्मक आरोग्य आणि निरोगीपणा क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण, वाढती जागरूकता, बदलती जीवनशैली आणि लवकर निदान करण्यावर वाढलेला भर यामुळे ही वाढ होत आहे. सोवाकाद्वारे, डॉ. लाल पॅथलाब्स प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत आहे. सोवाका सर्वसमावेशक असून पुराव्यांवर आधारित उपाय ग्राहकांना प्रदान करते असाही दावा कंपनीने यावेळी केला.व्यक्तींना त्यांचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि लवकर कृती करण्यास कंपनी ग्राहकांना सक्षम करते. सोवाका हे भारतातील एक विश्वसनीय डायग्नोस्टिक्स ब्रँड असलेल्या डॉ. लाल पॅथलाब्सचा प्रीमियम वेलनेस विभाग आहे. सायन्स बिहाइंड वेलनेस (Science Beyond Welness) या टॅगलाइनसह सोवाका निदान क्षेत्रातील दर्जा वैद्यकीय कौशल्य आणि एआय तंत्रज्ञान यांचा संगम (Intergration)साधून वैयक्तिकृत प्रतिबंधात्मक आणि भविष्यसूचक (Futuristic) आरोग्य अनुभव प्रदान करते असे कंपनीने यावेळी सूचित केले.


दरम्यान डिसेंबर १९ तारखेला कंपनीने गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये शेअर स्प्लिटमुळे ५१% घसरण झाली होती.आज शेअर्समध्ये १.३०% घसरण झाली असून गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये २.०१% घसरण झाली आहे. गेल्या ६ महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ३.९९% वाढ झाली असून १ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १.०६% घसरण झाली आहे. दरम्यान इयर टू डेट बेसिसवर (YTD) ०.२३% घसरण शेअरने नोंदवली.

Comments
Add Comment

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

Crime News: तांत्रिक शक्तीच्या हव्यासापोटी एकुलत्या एक मुलाचा बळी; बहिणीनेच घेतला पाच वर्षांच्या भावाचा जीव

चंदिगड: हल्ली माणसं पैशांच्या, संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्याच जवळच्या माणसांची हत्या करत आहेत.. तसंच

धुरंधर पार्ट २ लवकरच होणार रिलीज; अखेर तो दिसणार की नाही?

Dhurandhar 2 Big Entry : धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने तूफान कामगिरी करत केली असून

बँक ऑफ महाराष्ट्राची व्यवसाय आकडेवारी जाहीर तुम्ही हा शेअर खरेदी करावा का? वाचा

मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने आपल्या व्यवसायाची आकडेवारी जाहीर केली आहे. मजबूत आकडेवारीनंतर आता

Nanded Crime :पत्नी सोडून गेल्याने पती निराश; बालकासह केली आत्महत्या

नांदेड : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. ताजी घटना नांदेड जिल्ह्यातील आहे. पत्नी