कचराभूमीच्या दुर्गंधीवरील तोडग्यासाठी समितीची स्थापना

लखनऊच्या घनकचरा प्रकल्पाचा अभ्यास करून शिफारस करण्याच्या सूचना


मुंबई : कांजूरमार्ग येथील कचराभूमीवरील दुर्गंधीबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची स्थापना करण्यात आली असून समितीला तत्काळ कचराभूमीला भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन तेथील घनकचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करण्याच्या आणि उच्च समितीला शिफारस करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


कांजूरमार्ग येथील कचराभूमीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा व प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असण्याबाबत आतापर्यंत झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने आणि एका रहिवासी संघटनेने या कचराभूमीला विरोध करून त्या विरोधात मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही जनहित याचिका आणि इतर आव्हान याचिका यांच्यावर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांनी सातत्याने येणारी दुर्गंधी, वायू, तसेच रहिवाशांमध्ये श्वसन व त्वचारोगांसारख्या आरोग्य समस्या असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यावर कांजूरमार्ग क्षेपणभूमीच्या परिसरात दुर्गंधी पसरण्याची परिस्थिती चिंताजनक आहे, असे स्पष्ट करून न्यायालयाकडून पालिकेवर ताशेरे ओढण्यात आले.


याचिकाकर्त्यांचे सवाल… : ही समिती पुढे सहा महिन्यांनी आपला अहवाल सादर करणार तोपर्यंत लोकांनी कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडमधून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास सहन करत रहायचा का? जर समिती स्थापन करायची होती, नवीन अमेरिकन तंत्रज्ञान आणायचे आहे तर मग मागील १४ वर्ष मुंबई महानगरपालिका , कंत्राटदार आणि सरकार न्यायालयाची आणि स्थानिक (कांजूरमार्ग, भांडुप, विक्रोळी, पवई) रहिवाशांची दिशाभूल करत होते का? ह्या समितीवर स्थानिक रहिवाशांनी कोणत्या निकषांवर विश्वास ठेवायचा. मागील १४ वर्षांपासून जो आरोग्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना झाला त्याची भरपाई प्रशासन, महाराष्ट्र सरकार, व कंत्राटदार करेल का? असे सवाल याचिकाकर्ते संजय येलवे यांनी उपस्थित केले आहेत. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरूपी बंद करून या आमच्या विभागातून हटवण्यात यावे हीच आमची मागणी आहे, असेही येलवे म्हणाले.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये