मुबंईकरांची लाईुलाईन म्हणजेच मुबई लोकलाचा मेगा ब्लॅाक सुरु होणार आहे.मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांसाठी मेगाब्लॉक लागू झाला आहे. या काळात मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास टाळण्याचा किंवा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
मेगाब्लॉकचा मुख्य कारण म्हणजे कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेले सहाव्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नवीन मार्गिका अस्तित्वात असलेल्या जलद मार्गाला जोडण्यासाठी आणि तांत्रिक यांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर तसेच पाचव्या मार्गिकेवर वाहतूक बंद राहणार आहे.
मध्यरात्री असलेल्या ब्लॉकमुळे सकाळच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. अप जलद मार्गावर मंगळवारी 12:00 रात्री ते बुधवारी 5:30 पर्यंत, तर डाऊन जलद मार्गावर 1:00 रात्री ते 4:30 पहाटे पर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत, ज्यामध्ये प्रवाशांच्या पसंतीच्या AC लोकल आणि 15 डब्यांच्या जलद गाड्याही समाविष्ट आहेत. पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही पूर्णपणे बंद राहणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना उशिरा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.यामुळे थोड त्रास होण्याची शक्यता आहे...
दरम्यान, लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महत्त्वाच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जातील. तेजस राजधानी (मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली) गाडीला 1 अतिरिक्त 3AC डबा जोडला गेला आहे, स्वर्ण जयंती राजधानी (साबरमती – नवी दिल्ली) गाडीला 1 अतिरिक्त डबा जोडला गेला आहे, आणि मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेससाठीही अतिरिक्त डबे निश्चित केली आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सूचित केले आहे की, या दोन दिवसांत प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा...