ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने केलं विष प्राशन; सांगलीतलं राजकीय वातावरण तापल

ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने केलं विष प्राशन; सांगलीतलं राजकीय वातावरण तापलं
सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना आता एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानकडून होत आहे. मात्र काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाचे आरोप फेटाळले आहेत.

नक्की घडलं काय ?

प्रभाग क्रमांक १६ मध्ये ठाकरे गटाकडून उमर गवंडी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमर गवंडी यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. याच दबावामुळे उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दोन्ही राजकीय गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित केली.

दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या उषाताई जाधव यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत म्हटले की, उमेदवाराला प्रचार करू दिला जात नाही, दडपशाही आणि धमक्यांचे प्रकार सुरू आहेत. या संदर्भातील पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकशाहीत अशा प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गंभीर आरोप होत असताना काँग्रेसकडून स्पष्टीकरण आले आहे. प्रभाग अर्थात वॉर्ड १६ मध्ये प्रचार सुरू आहे. कुणावर दबाव टाकला नाही. घरगुती कारणामुळे उमेदवाराची आई विषबाधित झाली होती; तिची तब्येत आता ठीक आहे.
Comments
Add Comment

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Cyber Fraud : नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मोठी सायबर फसवणूक, तब्बल ९० लाखांचा घोटाळा

नाशिक : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे (Mumbai ATS) नाव

Greater Noida Crime : अंगावर काटा आणणारी घटना! चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून दूर नेलं अन्...; पोलिसांकडून थेट एन्काऊंटर

हलदौनी : ग्रेटर नोएडातील हलदौनी गावात 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर

Congress Leader Murder : फिरोजपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, पोलीस तपास सुरु

फिरोजपूर : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक

Terrorist in prison : कारागृहात दहशतवाद्याकडून 3 आयफोनसह रोकड जप्त

कोलकाता : पश्चिम बंगालमधील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोलकात्याच्या अलीपूर येथील प्रेसिडेन्सी सेंट्रल