जानेवारीत परदेशी गुंतवणूकदारांकडून 'सेल ऑफ' सुरुच २ दिवसात ७६०८ कोटी स्वाहा!

मोहित सोमण: गेल्या आठवड्यात अहवालाप्रमाणे संपूर्ण वर्षभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FIIs) यांनी शेअर बाजारातून सर्वाधिक १ लाख कोटीहून अधिक निधी काढण्याचे आपल्याला दिसले होते. याच धर्तीवर नव्या प्रोविजनल आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२६ ची सुरुवात सावधपणे करत त्यांनी जानेवारी २०२६ मध्येही विक्रीचाच कित्ता गिरवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय इक्विटीमधून ७६०८ कोटी रुपये (८४६ दशलक्ष डॉलर्स) काढून घेतले आहेत. ही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढलेली रोख गुंतवणूक ही बाजारातील अस्थिरतेचे प्रतिक आहे असे समजले जाते. त्यातून इराण इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता युएस व्हेनेझुएला यांच्यातील हाराकिरी या कारणामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना शाश्वत मूल्य दिसत नाही. याच कारणामुळे विक्रीत वाढ होत असताना विशेष घसरण आयटी, एफएमसीजी क्षेत्रीय निर्देशांकात दिसून येत आहे.


आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नोंदवलेल्या १.६६ लाख कोटी रुपये म्हणजेच १८.९ अब्ज डॉलर्सची जावक (Outflow) बाजारात झाला. या मोठ्या विक्री पार्श्वभूमीवर रूपयांतील मूल्यात मोठी चढउतार झाली आहे. अस्थिर चलनाच्या हालचालीसह जागतिक व्यापारी तणाव, युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर असलेली अनिश्चितता, सातत्याने डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रूपयांसह संभाव्य तिमाही निकालासाठी गुंतवणूकदारांनी बाळगलेली सावधगिरी या कारणांमुळे बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीच सुरूच ठेवली होती.


परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (FPIs) या सततच्या विक्रीच्या दबावामुळे २०२५ मध्ये बाजारातील अहवालानुसार रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन (Devaluation) ५% अवमूल्यन होण्यास आणखी कारणीभूत ठरला आहे. मात्र विश्लेषकांच्या मते बाजारातील तज्ञांचा विश्वास आहे की २०२६ मध्ये परिस्थिती बदलू शकते. २०२६ वर्ष सकारात्मक परिवर्तनासह स्थिर बाजारात बदलू शकेल असा तज्ञांचा विश्वास आहे.या सकारात्मक अपेक्षा असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FPIs) ने २०२६ ची सुरुवात सावधपणे केली आहे आणि एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, त्यांनी केवळ २ दिवसात १ ते २ जानेवारी दरम्यान भारतीय इक्विटीमधून जवळपास ७६०८ कोटी रुपये काढून घेतले आहेत.


यावर प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, 'या वर्षी एफपीआय (FPI) च्या धोरणात बदल होण्याची शक्यता आहे, कारण सुधारणारी देशांतर्गत मूलभूत तत्त्वे निव्वळ परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करू शकतात. मजबूत जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट कमाईतील पुनर्प्राप्तीची शक्यता येत्या काही महिन्यांत सकारात्मक FPI प्रवाहासाठी शुभसंकेत आहेत'


प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एंजल वनचे वरिष्ठ मूलभूत विश्लेषक वकार जावेद खान म्हणाले आहेत की,'भारत-अमेरिका व्यापार संबंधांमधील सामान्यीकरण अनुकूल जागतिक व्याजदर वातावरण आणि USD-INR जोडीतील स्थिरता परदेशी गुंतवणूकदारांसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार करू शकते.' पुढे त्यांच्या मते, गेल्या वर्षाच्या तुलनेत इक्विटी मूल्यांकन तुलनेने अधिक समाधानकारक झाले आहे, ज्यामुळे गुंतवणुकीच्या पुनरुज्जीवनाला आणखी पाठिंबा मिळू शकतो.


खान म्हणाले की, हा कल असामान्य नाही, कारण परदेशी गुंतवणूकदार ऐतिहासिकदृष्ट्या जानेवारीमध्ये सावध राहिले आहेत आणि गेल्या दहापैकी आठ वर्षांत त्यांनी निधी काढून घेतला आहे.परिणामी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार प्रवाह जागतिक संकेत आणि मॅक्रोइकॉनॉमिक घडामोडीं प्रति अत्यंत संवेदनशील राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात उच्च मूल्यांकन ही एक प्रमुख चिंता होती, परंतु तो दबाव सध्या कमी झाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे भविष्यासाठी काही आशावाद निर्माण झाला आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत.


मात्र विशेष उल्लेख म्हणजे २ जानेवारीला शेअर बाजारातील व कॅपिटल मार्केटमध्ये घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors DIIs) यांनी आपली रोख गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांपेक्षाही एनएसईतून काढून घेतली होती. प्रोविजनल आकडेवारीनुसार २ जानेवारीला घरगुती गुंतवणूकदारांकडून १३७८३.०२ कोटींची गुंतवणूक विक्री झाली होती तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ६८७९.९८ कोटीची विक्री झाली होती. हाच किस्सा बीएसई, एसएमईवर कायम राहत सगळ्या बाजारातील एकूण विक्रीतही घरगुती गुंतवणूकदारांनी १४६७२.१८ कोटींची अधिक गुंतवणूक विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ७६६०.६५ कोटी तुलनेत केली होती.

Comments
Add Comment

१ फेब्रुवारी रोजी रविवार आल्याने अर्थसंकल्प कधी ?

२८ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी १

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

नगरसेवक बिनविरोध आल्याने काहींना मिर्ची झोंबली!

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला धुळे (प्रतिनिधी) : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या