मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या सकारात्मक पुरवठ्यामुळे जगभरात कच्चे तेल घसरत आहे. मात्र तरीही भारतीय तेल उत्पादन व विपणन (Marketing) कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. उपलब्ध माहितीनुसार, दुपारी २.२२ वाजेपर्यंत ओएनजीसी (१.५६%), ऑईल इंडिया (२.२५%), डीप इंडस्ट्रीज (४.०४%), जिंदाल ड्रिलिंग (५.८०%), एचओईसी (१.४८%) समभागात मोठी घसरण झाली आहे.अपवाद म्हणजे जीएनआरएल (८.७२%), डोल्फिन एंटरप्राईजेस (०.९७%), ड्यूक ऑफशोअर (०.६८%) समभागात वाढ झाली आहे. पण प्रामुख्याने मुख्य फळीतील सगळ्याच शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना फटका बसला. सुरूवातीला वाढत असलेले शेअर्स मात्र दुसऱ्या सत्रात कोसळताना पहायला मिळाले आहेत.
विश्लेषकांची युएस व्हेनेझुएला यांच्यातील संघर्षानंंतर युएसने व्हेनेझुएला देशावरील कब्जा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. युएस ऑईल रिफायनरीला देशातील प्रवेश सोपा झाल्याने युएसकडून तेलाच्या पुरवण्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे सकाळी १% पेक्षा अधिक स्तरावर तेल स्वस्त झाले होते. प्रत्यक्षात भारतीय बाजारात तेलाच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.
जगभरातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून व्हेनेझुएलाकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात अमेरिकेतील नेतृत्वाने देशावर कब्जा केल्यानंतर मोठी आर्थिक स्थित्यंतरे अपेक्षित असून व्हेनेझुएलाकडून केल्या जाणाऱ्या निर्यातीतही यांचा परिणाम होऊ शकतो असे सांगितले जाते असे असताना कच्च्या तेलाच्या शेअर्समध्ये आज दबाव वाढला असून तज्ञांच्या मते व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था घसरल्यास दीर्घकालीन परिणाम म्हणून मध्यपूर्वेतील, रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी दबाव निर्माण ह़ोऊ शकतो व अंतिमतः तेल किंमत महाग होऊ शकते. सध्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाची २०% अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या व्यापार व उत्पादनावर अवलंबून आहे. याच कारणामुळे ओपेककडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात स्थिरता दिसत असली तरी कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात करण्याची मागणी काही व्यापारी करत आहेत. दरम्यान ५०% कच्चे तेल रशियाकडून भारतात येत असताना भारतालाही युएस व मध्यपूर्वेतील तेलासाठी पर्याय उपलब्ध असतील. एकूणच ही भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा फटका बाजारात बसल्याने तेल कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.
भारतीय बाजाराबाबत भाष्य करताना ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या किमतींवर नजीकच्या काळात होणारा परिणाम कमी असण्याची शक्यता आहे. तथापि, दर युएसकडून निर्बंध शिथिल झाल्यानंतर अमेरिकेच्या प्रमुख तेल कंपन्यांनी व्हेनेझुएलामधील उत्पादन पुन्हा सुरू केल्यास मध्यम मुदतीत कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. विश्लेषकांनी सांगितले की, जोपर्यंत ओपेक बाजारात संतुलन राखण्यासाठी हस्तक्षेप करत नाही, तोपर्यंत २०२७-२८ मध्ये अतिरिक्त पुरवठ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊ शकतो.
याविषयी गुंतवणूक तज्ञ कंपनी जेफरीजने म्हटले आहे की, जर निर्बंध हटवले गेले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होऊ शकतो, कारण कंपनी पूर्वी तिच्या दैनंदिन कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे २० टक्के तेल व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल कंपनी पीडीव्हीएसए (PDVSA) कडून खरेदी करत होती. रिलायन्सला ब्रेंटच्या तुलनेत प्रति बॅरल ५-८ डॉलरच्या सवलतीत व्हेनेझुएलाचे कच्चे तेल मिळू शकते, ज्यामुळे तिच्या एकूण रिफायनिंग मार्जिनला आधार (Margin Supports) मिळेल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजची जामनगर येथे देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी कंपनी आहे.