मुंबई : सध्या जागतिक राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू असून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव जगाच्या चिंतेत भर घालत आहे. अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईनंतर तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात प्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा आणि नॉस्ट्रेडेमस यांच्या जुन्या भविष्यवाण्यांची चर्चा रंगू लागली आहे. अनेक दशकांपूर्वीच त्यांनी २०२६ मध्ये मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली होती
बल्गेरियाच्या अंध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी २०२५ पासून युरोप आणि अमेरिकेच्या परिसरात अशा घडामोडी घडतील, ज्या जगासाठी विनाशकारी ठरू शकतात, असे भाकीत केले होते. सध्या अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेली कारवाई हीच त्या संभाव्य विनाशाची सुरुवात असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडेमस यांनी त्यांच्या ‘लेस प्रोफेटिस’ या ग्रंथात एका महासागर ओलांडून येणारी शक्ती दक्षिणेकडील एका देशावर हल्ला करेल, असा उल्लेख केला आहे. या संघर्षातून मोठ्या प्रमाणावर रक्तपात होईल, असेही त्यांनी सूचित केले होते. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील देश असल्याने ही भविष्यवाणी आजच्या परिस्थितीशी जुळत असल्याचे अनेकांचे मत आहे.
बाबा वेंगा यांच्या मते २०२६ हे वर्ष जगासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते. व्हेनेझुएलाच्या बाजूने रशिया किंवा चीनसारख्या महासत्ता उभ्या राहिल्यास स्थानिक संघर्ष जागतिक युद्धात रूपांतरित होण्याची भीती आहे. नॉस्ट्रेडेमस यांनीही दीर्घकाळ चालणाऱ्या मोठ्या जागतिक संघर्षाचा उल्लेख आपल्या भविष्यवाण्यांमध्ये केला आहे.
या दोन्ही भविष्यवेत्त्यांनी युद्धकाळात निसर्गही प्रचंड रौद्र रूप धारण करेल, असे सांगितले होते. सध्या सुरू असलेले हवामान बदल, भूकंप, अतिवृष्टी आणि वाढता युद्धजन्य तणाव हे सगळे या भविष्यवाण्यांशी साधर्म्य दर्शवतात, असे मानले जात आहे.
या संघर्षानंतर जुन्या महासत्तांचे वर्चस्व संपुष्टात येईल आणि नवीन जागतिक व्यवस्था उदयास येईल. अमेरिकेची सध्याची लष्करी पावले ही सत्तेसाठीचा शेवटचा प्रयत्न ठरेल की विनाशाचे कारण ठरेल, हे येणारा काळच ठरवणार आहे.
बाबा वेंगा यांनी २०२६ मध्ये अंतराळाशी संबंधित मोठ्या संकटाचाही उल्लेख केला होता. युद्धाच्या काळातच पृथ्वीवर एखादी मोठी खगोलीय घटना घडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी भाकीत केले होते, जी मानवी संस्कृतीसाठी गंभीर ठरू शकते.






