केवळ ७ कोटींचा दाक्षिणात्य सिनेमा, पण थरार हॉलीवूडला टक्कर देणारा वाचा सविस्तर

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दर्जेदार कथानक, जबरदस्त सस्पेन्स आणि हादरवून सोडणाऱ्या क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजय सेतुपतीचा 'महाराजा' असो किंवा मोहनलाल यांचा 'दृश्यम', या सिनेमांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं. त्यामुळेच हल्ली प्रेक्षक वेगळ्या कथांच्या, विचार करायला लावणाऱ्या गोष्टींच्या आणि शेवटपर्यंत थरार टिकवून ठेवणाऱ्या सिनेमांच्या शोधात असतात.


असाच एक तमिळ थ्रिलर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने सस्पेन्सच्या बाबतीत या सगळ्या सिनेमांना जोरदार टक्कर दिली. चित्रपटगृहात रिलीज होताच प्रेक्षकांचे श्वास रोखून धरणारा हा सिनेमा आजही ‘बेस्ट क्राईम थ्रिलर’ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.


या सिनेमाची कथा अरुण नावाच्या तरुणाभोवती फिरते. अरुणला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं आणि त्यासाठी तो सायको किलर्सवर सखोल अभ्यास करत असतो. मात्र कालांतराने त्याला पोलीस अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारावी लागते. इथूनच कथेला खरा वेग येतो. कारण असाच एक सायको किलर अमानुष खुनी प्रत्यक्षात शहरात धुमाकूळ घालत असतो. अशी काहीशी ही कथा आहे


या मास्टरपीस चित्रपटाचं नाव आहे रतसासन. राम कुमार दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता विष्णु विशालने मुख्य मुख्य भूमिका साकारली आहे. अमला पॉल आणि सरवनन यांनीही दमदार अभिनय केला आहे.


या चित्रपटाला IMDb वर ८.३ इतकं दमदार रेटिंग मिळालं असल्यामुळे त्यामुळे थ्रिलरप्रेमींसाठी हा सिनेमा पाहणं जवळपास अनिवार्यच आहे. विशेष म्हणजे, रतसासन हा कोणताही मोठ्या बजेटचा सिनेमा नव्हता. केवळ ७ कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २३ कोटींहून अधिक कमाई केली. मात्र कमाईपेक्षा जास्त या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं.


कुठे पाहाल?


हा थरार अनुभवायचा असेल, तर रतसासन सध्या जिओ सिनेमा आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. विकेंडला घरबसल्या जबरदस्त थ्रिलर पाहायचा असेल, तर हा सिनेमा नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर मनोरंजन विश्वातिल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

अ‍ॅटलीने दीपिका पादुकोणला म्हटले ‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार अगदी नवा अवतार

मुंबई : दिग्दर्शक अ‍ॅटली यांचा आगामी चित्रपट, ज्याला सध्या AA22XA6 असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे, अधिकृत

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे

Konkan Hearted Girl : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने शेअर केली गुड न्यूज; घरी आली नवी ‘लक्ष्मी’...

बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी