न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. ६ जानेवारी रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबईकडून तो हिमाचल प्रदेशविरुद्ध मैदानात उतरेल, त्यानंतर ८ जानेवारीला तो पुन्हा खेळताना दिसू शकतो.आणि यामुळे क्रिकेट चाहंत्यानमध्ये भरपूर उत्साह सुद्धा पहायला मिळत आहे.पण बंगळुरु येथील BCCI च्या (Center of Excellence) खेळाडु श्रेयस अय्यरला काही अटीसह खेळण्याची परवाणगी देण्यात आली आहे. ३१ वर्षीय अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना फिल्डींग करता वेळी दुखापत झाली होती....
या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर अय्यरने आपल्या पुनर्वसनासाठी बंगळुरूतील बीसीसीआय सेंटरमध्ये जवळपास १० दिवसांचा रिहॅबिलिटेशन कालावधी पूर्ण केला.‘रिटर्न-टू-प्ले’ प्रोटोकॉलनुसार, २ जानेवारी रोजी अय्यरने एक सराव सामना खेळला. विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना जाणवल्या नाहीत. याच आधारे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला पुढील सामन्यांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. श्रेयस अय्यरला बीसीसीआयने थेट संघात स्थानच दिले नाही, तर त्याला उप कर्णधारही बनवले आहे. पण त्याला उप कर्णधारपद भूषवण्यासाठी बीसीसीआयच्या एका अटीचे पालन करावे लागणारर आहे. यामुळे पुढो काय होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे