गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वात अनेक नावं फिरत आहेत. अभिनेता, सोशल मीडिया स्टार्स, लावणी नृत्यांगना आणि राजकारणाशी निगडित काही सेलिब्रिटी यंदा घरात दिसू शकतात,पण कोण आहेत. ते स्पर्धक अशी जोरदार चर्चा सुरु आहे डॅनी पंडित, अथर्व रुखे, गौतमी पाटील, गुणरत्न सदावर्ते, विनायक माळी, गौरव मोरे, सोनाली राऊत, धनश्री कडगावकर ते थेट गिरिजा ओकपर्यंत अनेक नावं चर्चेत आली. मात्र, या यादीतील कोणत्याही नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही..
बिग बॉस मराठी 6 साठी काही स्पर्धकांची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.‘चला हवा येऊ द्या’मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेता-कॉमेडियन सागर कारंडे, मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अनुश्री माने, मराठी सिनेइंडस्ट्रीतील ओळखीचा चेहरा आणि राजकारणात सक्रीय असणारी दिपाली सय्यद, तसेच लावणी नृत्यांगना राधा मुंबईकर आणि अभिनेत्री रसिका जामसुदकर — या सर्व नावांवर (Bigg Boss Marathi 6 ) साठी शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान या खेळाच्या आधीच्या पर्वाबद्दल सांगायचे झाल्यास, Bigg Boss Marathi ५ चे विजेतेपद कंटेट क्रिएटर-अभिनेता सूरज चव्हाणने जिंकले होते.तर अभिजीत सावंत या स्पर्धेचा उपविजेता ठरला. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाण विजयी झाला होता. बिग बॉस मराठी ५ जसा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गाजला, तसाच बिग बॉस मराठी ६ सुद्धा तितकाच धमाका करणार का, याची उत्सुकता आणि चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.