भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे!

उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका


मुंबई : राज्याच्या राजकारणात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीचा आज मुंबईतील वरळीत मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.


या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगरमिठीमधून सोडवायचं आहे’, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


“आजची सभा ही मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाच्या ललकाराची सभा आहे. गेल्या एवढ्या वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. पण आता आपल्याला या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. लाडके मुंबईकर, या मुंबईवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, मुंबई महापालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि मुंबई महापालिकेचा महापौर मराठीच होणार”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


“काही लोकांना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मात्र, या मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? हे सांगा. एक काम तरी तुम्ही मराठी माणसांसाठी केलं का? त्यांचा (उद्धव ठाकरे यांचा) म मराठीचा नाही, म मलिद्याचा आहे, म मतलबाचा आहे, म मुजोरीचा आहे, वरून किर्तन आणि आतून तमाशा, असं त्यांचं काम आहे. मात्र, आमचा म मराठीचा आहे, आमचा म महाराष्ट्राचा आहे, आमचा म महायुतीचा आहे. त्यांच्यामधील आणि आमच्यामधील हा फरक आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.


“मग तुम्ही २० वर्षांसाठी वेगवेगळे का आणि कोणासाठी झाला होतात? (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे), आता जनतेने तुमचा बॅड वाजवल्यानंतर तुम्हाला ब्रँडची आठवण आली. मात्र, खरा ब्रँड बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्यानंतर महायुतीचा कार्यकर्ता खरा ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, शिवसेनेचा विचार आम्ही जपला आहे”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

अजित दादांच्या विमान अपघात वैमानिकांबाबत समोर आले हे धक्कदायक खुलासे .... सस्पेंड, अल्कोहोल टेस्ट......

पुणे : महाराष्ट्राचे लाडके अजित दादा आज अनंतात विलीन झाले. बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित दादांचा बारामती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र; हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश

मुंबई :  २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली