बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व वैभव सूर्यवंशीने केले. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या सामन्यात, तो १२ चेंडूत फक्त ११ धावा करू शकला, पण असे असूनही, हा सामना त्याच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक कामगिरी ठरला.
सूर्यवंशीने विक्रम केला
वयाच्या १४ व्या वर्षी, सूर्यवंशी युवा एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. यासोबतच, तो १६ वर्षांच्या आधी कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय १९ वर्षांखालील सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा पहिला क्रिकेटपटू बनला...त्याने इतिहास रचला. या कामगिरीसह त्याने पाकिस्तानच्या अहमद शहजादचा १९ वर्षांचा विक्रम मोडला.
नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हते. यामुळे सूर्यवंशीला तीन सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. तथापि, १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडू पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे.
वैभव सतत खळबळ उडवत आहे
वैभव सूर्यवंशी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या विक्रमी आणि स्फोटक फलंदाजीने चर्चेत आला होता. रांची येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारकडून खेळताना त्याने फक्त ३६ चेंडूत शतक झळकावले. त्याने ८४ चेंडूत १६ चौकार आणि १५ षटकारांसह १९० धावांची धमाकेदार खेळी केली. यामुळेच बिहारने अरुणाचल प्रदेशवर ३९७ धावांचा मोठा विजय मिळवला... या ऐतिहासिक खेळीदरम्यान, वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करण्याचा एबी डिव्हिलियर्सचा जुना विक्रमही मोडला...त्याने ही कामगिरी १० चेंडू आधी केली.शिवाय, त्याने त्याच्या डावात मारलेले १५ षटकार हे लिस्ट ए फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.
ज्युनियर आणि डोमेस्टिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे, सूर्यवंशीची अलीकडेच २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली. तसेच २०२० च्या १९ वर्षांखालील संघासाठी बिहारचा उपकर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचा सन्मान केला. त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) देखील प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतातील १८ वर्षांखालील मुलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो विविध क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी आणि उत्कृष्टतेसाठी ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना दिला जातो.