अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला

देशात आणीबाणी जाहीर, रस्त्यांवर रणगाड्यांचा संचार


नवी दिल्ली : लॅटिन अमेरिकेतील राष्ट्र व्हेनेझुएला व अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटला असून शनिवारी सकाळी अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर हवाई हल्ले केले. त्यानंतर काही तासात अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवरील हँडलवर याची माहिती दिली. ते म्हणाले, अमेरिकेने शनिवारी व्हेनेझुएला आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. अमेरिकन सैन्याने या कारवाईत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले असून देशाबाहेर काढले आहे.


व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये शनिवारी पहाटे जोरदार स्फोट झाले. शहरामध्ये एकामागून एक मोठ्या आवाजाचे धमाके ऐकू आले. स्थानिक वेळेनुसार पहिला स्फोट रात्री साधारण १.५० वाजता झाला. त्यानंतर काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. आकाशात विमानांसारखे आवाज ऐकू येत होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडीओंमध्ये रात्रीच्या अंधारात धुराचे मोठे लोट दिसत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात लष्करी जवान पहारा देत होते. व्हेनेझुएलाच्या सरकारने निवेदन जारी करत अमेरिकेवर हल्ल्याचा आरोप केला.


राजधानी कराकससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या राज्यांमध्ये नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. ‘ही कारवाई म्हणजे अमेरिकेचे थेट लष्करी आक्रमण आहे. अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,’ असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.


राजधानीसह संपूर्ण देशात तणावाचे वातावरण


या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या विमानांसाठी व्हेनेझुएलाचे संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केल्याचे सांगितले जात आहे. याआधीही अमेरिका व्हेनेझुएलामध्ये अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाईचे संकेत देत होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएलाविरोधात थेट लष्करी कारवाईची शक्यता नाकारलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. सध्या कराकसमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असून लष्करी हालचाली वाढल्या आहेत. स्फोटांचे नेमकं कारण काय, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी राजधानीसह संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, एक ताब्यात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला झाला. ओहायोमध्ये असलेल्या जेडी व्हॅन्स

ट्रम्प यांच्याकडून भारताला करवाढीची पुन्हा धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने आता थेट जपानच्या

बाबा वांगा ची भविष्यवाणी जगावर येणार मोठं संकट व्हेनेझुएलावर हल्ला हा भविष्यवाणीचा इशारा

मुंबई : सध्या जागतिक राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू असून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव जगाच्या

व्हेनेझुएला नंतर ट्रम्पचे नवे टार्गेट ठरले, या देशाला दिल्या धमक्या

वॉशिंग्टन डीसी : ड्रग्जचे कारण देत अमेरिकेने तेलासाठी व्हेनेझुएला विरोधात लष्करी कारवाई केली. व्हेनेझुएलाचे

मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा महायुद्ध

नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना

US attack on Venezuela : हातात बेड्या, डोळ्यावर पट्टी बांधून राष्ट्राध्यक्षाला आणलं उचलून, ट्रम्प यांच्याकडून Photo जारी

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याने संपूर्ण