नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साखरेच्या सीझनची जोरदार सुरुवात झाली. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेड अर्थात NFCSF च्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ मध्ये देशातील साखरेचे सरासरी वार्षिक उत्पादन २३.४३ टक्के वाढून ११.८३ मिलियन टन पोहोचले आहे. देशातील साखरेच्या उत्पादन वाढीमागे महाराष्ट्रातील साखर उत्पादनातील वाढ कारणीभूत ठरली आहे. NFCSF नुकतेच जारी केलेल्या निवेदनात सांगितले की ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील सुमारे ४९९ साखर कारखान्यांनी गळीप हंगामात भाग घेतला. या दरम्यान १३४ मिलियन टन उसाचे गाळप झाले. ज्यामुळे ११.८ मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले. या दरम्यान सरासरी साखरेची रिकव्हरी ८.८३ टक्के राहिली. देशात ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ दरम्यान उत्तर प्रदेशात साखर उत्पादन वाढून ३.५६ मिलियन टन झाले आहे. ही वाढ महाराष्ट्राच्या तुलनेत कमी राहिली. देशाचे दुसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. या राज्यात साखरेचे उत्पादन ६३ टक्के वाढून ४.८७ मिलियन टन पोहचले. जे गेल्यावर्षी २.९९ मिलियन टन होते. ऊस उपलब्धता आणि साखर कारखान्याची निरंतर गाळप क्षमतेमुळे महाराष्ट्र या हंगामात ग्रोथ इंजिन बनला आहे.