दहिसरमध्ये घोसाळकरांना सुनेपेक्षा मुलाच्या विजयाची चिंता?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच दहिसरमधील प्रभाग क्रमांक १मधील माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या सध्या प्रभाग क्रमांक २मधून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.तर दुसरीकडे त्यांचे दीर सौरभ विनोद घोसाळकर हे प्रभाग क्रमांक ७मधून उबाठाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे एकाच घरातील दोन उमेदवारी विरुध्द पक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नशीब आजमावत आहेत. मात्र,एका बाजुला सुनबाई भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याने माजी आमदार आणि उबाठाचे उपनेते विनोद घोसाळकर यांना त्यांची चिंता नसून त्यांना आता केवळ चिंता आहे ती प्रभाग क्रमांक ७मधून निवडणूक लढवणाऱ्या मुलगा सौरभची. कारण या प्रभागात भाजपाच्यावतीने पक्षाचे प्रवक्ते गणेश खणकर हे समोर असल्याने सौरभच्या विजयाची चिंता वडिल म्हणून विनोद घोसाळकर यांना अधिक असल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उबाठाकडून न्याय न मिळाल्याने माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पतीची अर्धवट इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा राजकारणात आपले पाऊल सक्षमपणे रोवण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांना भाजपाचा गड असलेल्या प्रभाग क्रमांक २मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उबाठाचे उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सुनबाई भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. तर घोसाळकर यांच्या वाट्याला एकमेव प्रभाग क्रमांक ७ येणार असल्याने याठिकाणी त्यांच्या दोन्ही सुनबाईंच्या नावाची चर्चा होती. पण तेजस्वी घोसाळकर यांनी उबाठाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्यामुळे प्रभाग सातमधून घोसाळक यांची दुसरी सुनबाई निवडणूक रिंगणात उतरेल अशी चर्चा होती; परंतु शेवटच्या क्षणाला प्रभाग सातमधून विनोद घोसाळकर यांचे दुसरे पुत्र सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि यामाध्यमातून घोसाळकर यांच्या दुसऱ्या पुत्रानेही राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या पुत्राला राजकारणात आणल्यानंतर त्यांना निवडणुकीत जिंकून आणण्याचा निर्धार करत विनोद घोसाळकर हे अधिक कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे

विविध चित्रपट आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता वकील बनून सत्यासाठी

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :

धर्मेंद्र यांच्या घरात खरंच पडली का फूट ? अखेर हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या

Hema Malini On Dharmendra Separate Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अ

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ची कथा आणखी गडद होणार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार प्रदर्शित

विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लिमिटेड यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2’, ज्याचे

Ranapati Shivray Swari Agra : दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

सध्या सोशल मीडियावर 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज