मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ उबाठातून भाजपमध्ये


मुंबई : उद्धव आणि राज यांनी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला. पण आजच्या दिवशी उबाठाला मोठा धक्का बसला. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला. शुभा राऊळ यांनी उबाठा सोडल्यानंतर काही तासांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.


माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकरांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. शेलार, दरेकर आणि राऊळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचे वृत्त येताच माजी महापौर शुभा राऊळ भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी राजकीय वर्तुळात पसरली. अखेर या वृत्तावर रविवारी संध्याकाळी शिक्कामोर्तब झाले. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राऊळ यांचे पक्षात स्वागत केले.



वरळीच्या प्रचारसभेत उपस्थित होत्या शुभा राऊळ


वरळी विधानसभा मतदारसंघात महायुतीने शनिवारी संध्याकाळी मुंबईतल्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेला शुभा राऊळ उपस्थित होत्या. फडणवीसांचे भाषण राऊळ यांनी लक्षपूर्वक ऐकले होते. यानंतर राऊळ यांनी उबाठाचा राजीनामा देण्याचा निर्णय अंतिम केला. उबाठा सोडल्यानंतर काही तासांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.



कोण आहेत शुभा राऊळ ?


शुभा राऊळ या २००७ ते २००९ या कालावधीत मुंबईच्या महापौर होत्या. त्या उबाठाच्या महिला नेत्या पण होत्या. दहिसरमधून अनेक टर्म नगरसेविका झालेल्या शुभा राऊळ यांनी महापौर असताना हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. उबाठातील विनोद घोसाळकरांच्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शुभा राऊळ यांनी २०१४ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. पण अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी घरवापसी केली होती. एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केल्यानंतरही शुभा राऊळ उद्धव ठाकरेंसोबतच होत्या. पण मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काही दिवसांनी शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


Comments
Add Comment

एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश

मुंबई :  २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

मद्यधुंध वाहनचालकाची धडक अन् ३० ते ४० विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला

पुणे : हल्ली वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अनेक रस्ते अपघाताच्या घटना या घडत आहे. असाच एक धक्कादायक आणि

वरळी कोस्टल रोडवर उभारणार मुंबईतील तिसरा हेलिपॅड; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : वरळीत मुंबईच्या कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅडची सुविधा उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन,

भारताचा विकास दर ७% राहणार - मुख्य आर्थिक सल्लागार

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी संसदेत अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण २०२५-२६ सादर

कमालीची अस्थिरता असताना शेअर बाजाराची वापसी,औत्सुक्याची वातावरण निर्मिती 'या' कारणामुळे सेन्सेक्स २२१.६९ व निफ्टी ७६.१० अंकाने उसळला

मोहित सोमण: सुरुवातीच्या कलात सावधगिरीचा फटका बसल्याने गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटीचे नुकसान झाले. मात्र पुन्हा