वॉशिंग्टन डीसी : ड्रग्जचे कारण देत अमेरिकेने तेलासाठी व्हेनेझुएला विरोधात लष्करी कारवाई केली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष चर्चेसाठी तयार असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर अमेरिकेच्या सैनिकांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करुन न्यूयॉर्कमध्ये आणले. या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तोच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबिया या देशाला धमकीवजा इशारा दिला आहे. कोलंबियात तयार होत असलेले कोकेन मोठ्या प्रमाणात अमेरिकेत येत असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना धमकीवजा इशारा दिला आहे.
अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या कोकेनला आळा घाला, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या; असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना दिल या इशाऱ्यामुळे व्हेनेझुएला नंतर ट्रम्पचे नवे टार्गेट कोलंबिया हा देश असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
व्हेनेझुएला प्रमाणेच कोलंबिया हा पण लॅटिन अमेरिका भागातील एक देश आहे. अधूनमधून अमेरिकेचे सैन्य समुद्रात कोलंबियात जात - येत असलेल्या बोटींची अडवणूक करुन जबरदस्तीने चौकशी करत असल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. आता व्हेनेझुएला प्रमाणेच कोलंबियावर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या देशात जात - येत असलेल्या बोटींची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कॅरेबियात डॅग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या जहाजांची नियुक्ती करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी टीका केली होती. यानंतर ट्रम्प यांनी आवश्यकता भासल्यास ड्रग्जच्या निर्मितीलाच आळा घालण्यासाठी कोलंबियावर विमानातून बॉम्बफेक करण्याचा विचार ट्रम्प यांनी बोलून दाखवा होता. यामुळे व्हेनेझुएला नंतर अमेरिका कोलंबियावर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वीच पेट्रोने कोलंबियाच्या हवाई हद्दीत अमेरिकेच्या लष्करी विमानांना बंदी घातली आहे. ही बंदी लागू झाल्यापासून अमेरिका आणि कॅरेबिया यांच्यातील तणाव वाढत आहे. हा तणाव आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.