टाटा मोटर्सची डिसेंबर विक्री आकडेवारी जाहीर थेट २३% वाढ

मोहित सोमण: टाटा मोटर्सने आपल्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. टाटाने जीएसटी कपात व पोर्टफोलिओत केलेली वाढ व वाढती मागणी, आकर्षक ऑफर या मुद्यावर आधारित चांगली कामगिरी केली आहे. नव्या आकडेवारीप्रमाणे टाटा मोटर्सने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) डिसेंबर महिन्यात आपल्या गेल्या तिसऱ्या तिमाहीतील ९५७७० युनिट्स तुलनेत या तिमाहीत ११५५७७ युनिट्सवर वाढ नोंदवल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी कंपनीचे स्कीम ऑफ अरेंजमेंट अंतर्गत विलिनीकरण झाले होते. यंदा केवळ डिसेंबर महिन्यात कंपनीच्या घरगुती व आंतरराष्ट्रीय विक्रीत एकत्रितपणे ४२५०८ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ती ३३८७५ युनिट्सवर होती.


उपलब्ध माहितीनुसार, एचसीव्ही (Heavy Commercial Vehicles) ट्रक विक्रीत गेल्या डिसेंबर महिन्यातील ९५२० वरून या डिसेंबर महिन्यात १२४८३ युनिट्सवर वाढ नोंदवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २३% नोंदवली गेली. पॅसेंजर कॅरियर्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ४१६७ तुलनेत या डिसेंबरमध्ये १०६९१ युनिट्सवर वाढ झाली. एकूण घरगुती व्यवसायिक वाहन (Domestic Commercial Vehicles) विचार केल्यास आकडेवारीनुसार, गेल्या डिसेंबरमध्ये विक्री झालेल्या ४००५७ तुलनेत या डिसेंबर महिन्यात १०७९१८ युनिट्सवर वाढ नोंदवली गेली आहे. एकूण व्यवसायिक वाहनात इयर बेसिसवर २१% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ४२५०८ तुलनेत या डिसेंबरमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २१% वाढ झाली आहे जी ११५५७७ युनिट्सवर पोहोचली आहे.


या निकालावर प्रतिक्रिया देताना टाटा मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वाघ म्हणाले, 'जीएसटी २.० मुळे मिळालेली विक्रीची गती आणि आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीतील सणासुदीच्या काळातील वाढ तिसऱ्या तिमाहीतही कायम राहिली, ज्यामुळे व्यावसायिक वाहनांच्या उद्योगाला चालना मिळाली आणि एकूणच सकारात्मक वातावरण निर्माण झाले.


टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकी विक्री वाढ नोंदवली. दीर्घकाळ चाललेल्या मान्सूननंतर बांधकाम आणि खाणकाम क्षेत्रातील जोरदार पुनरुज्जीवन, तसेच प्रमुख क्षेत्रांकडून आणि ऑटो लॉजिस्टिक्सकडून असलेल्या सातत्यपूर्ण मागणीमुळे ही वाढ शक्य झाली. स्मॉल कमर्शियल व्हेइकल्स (SCVs) आणि पिकअप्समधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे या वाढीला आणखी बळ मिळाले, परिणामी ११५५७७ युनिट्सची घाऊक विक्री झाली जी आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २१% आणि आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २२% अधिक आहे.


पुढे, आम्हाला आर्थिक वर्ष २६ च्या चौथ्या तिमाहीत बहुतेक व्यावसायिक वाहन विभागांमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. २०२६ मधील प्रमुख घटक म्हणजे सरकारचा पायाभूत सुविधांवरील सातत्यपूर्ण भर आणि अंतिम-वापर क्षेत्रांचा विस्तार, ज्यामुळे उद्योगाला सकारात्मक गती मिळेल अशी अपेक्षा आहे. उत्कृष्ट उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणारा अनुकूलित पोर्टफोलिओ, निर्णायक किंमत धोरण आणि तीव्र बाजारपेठ सक्रियतेद्वारे ग्राहकांशी सखोल संवाद साधल्यामुळे, टाटा मोटर्स सर्व विभागांमध्ये मागणी वाढवण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे यशाची ही मालिका पुढेही सुरू राहील.' असे म्हणाले आहेत.


काल शुक्रवारी टाटा मोटर्सचा शेअर ०.७६% वाढत ३७०.३५ रूपये प्रति शेअरवर स्थिरावला होता. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये २.४८% वाढ झाली असून गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ३.७८% वाढ झाली आहे तर संपूर्ण वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र २२.६०% घसरण झाली आहे. इयर टू डेट (YTD) बेसिसवर कंपनीच्या शेअर्समध्ये १.०५% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

अदानी समुहाकडून १००० कोटीचा एनसीडी गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार

मोहित सोमण: अदानी समुहाने १०००० कोटींची गुंतवणूक एनसीडी (Non Convertible Debentures NCD) मार्फत उभी करण्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके आणि तीन डेपो

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा माऊंटन टनेल-५ च्या यशस्वी कामामुळे ठाणे आणि अहमदाबाद

अर्ज मागे घेण्यासाठी कोणावरही दबाव आणला नाही - राहुल नार्वेकर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान कुलाबा मतदारसंघात विरोधी उमेदवारांना

आजचे Top Stocks Picks- देवयानी इंटरनॅशनलसह 'या' ६ शेअरला जेएमएफएल फायनांशियलकडून सल्ला

मुंबई: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपनीने गुंतवणूकदारांना काही

खाजगी बँकांना मागे टाकत असेट क्वालिटीत सरकारी बँकांचा 'बोलबाला'-RBI जाणून घ्या एका क्लिकवर!

आरबीआय फायनांशियल स्टॅबिलिटी रिपोर्ट- मोहित सोमण: बँकेच्या असेट क्वालिटीत चांगली सुधारणा झाल्याचे आरबीआयच्या

वर्षाची सुरुवात शेअर बाजारात वाढीनेच सेन्सेक्स १५७.९० व निफ्टी ४२.३५ अंकांने उसळला

मोहित सोमण: वर्षांचा पहिला दिवसही तेजीतच दिसत आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स