मोहित सोमण: पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank PNB) बँकेने आपल्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या वैश्विक व्यवसायात (Global Business) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ९.५७% वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबर मधील २६३९९९१ कोटींच्या तुलनेत यंदाच्या ३१ डिसेंबरपर्यंत २८९२६३० कोटींवर ही वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले. तर तिमाही बेसिसवर सप्टेंबर महिन्यातील २७८६६७३ कोटींच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात ३.८०% वाढत २८९२३६० कोटींवर वाढल्याचे आकडेवारीतून दिसून आले. तर घरगुती व्यवसायात (Domestic Business) इयर ऑन इयर बेसिसवर ९.०९% वाढ झाल्याचे दिसून आले. घरगुती व्यवसायातील गेल्या वर्षीच्या ३१ डिसेंबरमधील २५३४९६६ कोटीवरून या ३१ डिसेंबरपर्यंत २७६५२८८ कोटींवर वाढल्याचे दिसून आले आहे. तर तिमाही बेसिसवर हे ३.११% वाढले आहे.
जर ठेवींचा विचार केल्यास वैश्विक ठेवीत (Global Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ८.५४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ३१ डिसेंबर महिन्यातील १५२९६९९ कोटींच्या तुलनेत ८.५४% वाढ झाली असून यंदा ३१ डिसेंबरपर्यंत १६६०३८५ कोटींवर वाढ झाली आहे. तर तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) ३१ डिसेंबरपर्यंत ही घरगुती ठेवीत वाढ २.१४% झाली आहे. तर वैशिष्ट्य अँडव्हान्स (कर्जात) (Global Advances) इयर ऑन इयर बेसिसवर १०.९८% झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या ३१ डिसेंबरमधील ११०२९२ कोटींच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यापर्यंत १२३२२४५ कोटींवर वाढ झाल्याचे बँकेने म्हटले ज्यामध्ये ही रक्कम १०.९८% आहे तर तिमाही बेसिसवर यामध्ये ५.३६% वाढ दर्शविली गेली. घरगुती अँडव्हान्समध्ये (Domestic Advances) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ३१ डिसेंबर महिन्यातील १०६०२०५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १०.१५% वाढ झाली असून या ३१ डिसेंबरपर्यंत ११६७८०१ कोटींवर वाढ नोंदवली आहे. तिमाही बेसिसवर ही वाढ ४.४७% आहे.
बँकेच्या माहितीनुसार, सीडी (Cash to Deposit CD Ratio) गेल्या ३१ डिसेंबरपर्यंत ७२.५८% होता जो ३१ सप्टेंबर २०२५ पर्यंत ७२.३३% तर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ७४.२१% होता. यापूर्वी २९ डिसेंबरला शेअर्समध्ये ३% घसरण झाली होती कारण बँकेन एक्सचेंज फायलिंगमध्ये २४३४ कोटींचा घोटाळा झाल्याचे नोंदवले होते. एस आर ई आय (SREI), व एस आय एफ एल (SIFL) कंपनीनी कर्ज काढत संपूर्ण कर्ज थकित ठेवून घोटाळा केल्याचे कळवले होते. एनसीएलटी (National Company Law Tribunal NCLT) यावरील पुढील कारवाई करत आहे.
काल तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या शेअरने १.४०% वाढ नोंदवली ज्यामध्ये बँकेचा शेअर १२५.६८ रूपये प्रति शेअरवर स्थिरावला होता. गेल्या पाच दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये ४.८५% वाढ झाली आहे. तर संपूर्ण वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १८.१२% वाढ झाली आहे.