आंदोलकांवर गोळीबार झाल्यास मदतीसाठी धडकणार

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याच्या मुद्द्यावर इराणला गंभीर इशारा दिला आहे. जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर अमेरिका इराणविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत इराणला इशारा दिला आहे. जर इराणने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला व त्यांची क्रूरपणे हत्या केली, जी की त्यांची प्रथाच आहे, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्या मदतीसाठी धावून येईल. आम्ही पूर्णपणे सज्ज आणि तयार आहोत. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प,” अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे. इराणमध्ये मागील काही दिवसांपासून खोमेनी सरकारविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. आता यामध्ये अमेरिका उडी घेण्याच्या तयारीत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या या निदर्शकांना अमेरिकेचा काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे मानले जाते.


इराणमध्ये सत्ता बदलाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निदर्शनांचा शुक्रवारी सहावा दिवस होता. आर्थिक निदर्शनांनी आता राजकीय वळण घेतले आहे, निदर्शकांनी ‘हुकूमशहाला मृत्युदंड’ व ‘मुल्लांनो, देश सोडून जा’, अशा घोषणा दिल्या आहेत. इराणमध्ये पोलीस कारवाई व निदर्शकांविरुद्ध गोळीबारात काही निदर्शकांचे मृत्यू झाले आहेत. इराणमधील परिस्थिती वेगाने बदलत आहे. इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,