नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती


मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे.


सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार, एसटी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत.


सप्टेंबर २०२५ महिन्यात एकूण सुमारे ४९.७९ लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून ६४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढत ७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर नोव्हेंबर २०२५ मध्ये यूपीआय व्यवहारांमधून सुमारे ७८.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे.


डिसेंबर २०२५ मध्येही हीच वाढती प्रवृत्ती कायम राहिली असून,एकूण सुमारे ६२.५९ लाखांहून अधिक युपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून ८३.६७ कोटी रूपये महसुल जमा झाला आहे.


एसटी महामंडळाने बसस्थानकांवर, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रकमेचा व सुट्ट्या पैसे ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. अर्थात, त्यामुळे सुट्ट्या पैशावरुन वाहकांशी होणाऱ्या अनावश्यक वाद-विवादाला पूर्ण विराम मिळाला आहे.


याबरोबरच काही वाहकांकडून होणारा पैशाचा अपहार रोखण्यासाठी देखील डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत आहे. येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

मुंबई उपनगरीय रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक

मध्य व पश्चिम रेल्वेवरील सेवांमध्ये बदल मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल व

ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा

राज्यातील २९ लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविना

मुंबई : राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या