‘ऑपरेशन मनधरणी’नंतर आता भाजपकडून ‘ऑपरेशन समर्थन’ - माघार न घेतलेल्यांची समजूत काढणार; अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करणार

मुंबई : बंडखोरांना पक्षाच्या छत्रछायेत परत आणण्यासाठी भाजपने राबवलेल्या ‘ऑपरेशन मनधरणी’ला मोठे यश मिळाल्यानंतर आता पक्षाने ‘ऑपरेशन समर्थन’ हाती घेतले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही, अशा अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करून त्यांचे समर्थन अधिकृत भाजप उमेदवाराला मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे मतफुटी टाळून महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचा भाजपचा मानस आहे.


राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपसह सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. अर्ज माघारीची मुदत संपण्यापूर्वी पक्षाने वरिष्ठ नेत्यांना पाठवून बंडखोरांची समजूत काढण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही अनेकांना फोन केले. त्यानंतर, बऱ्याच बंडखोरांनी माघार घेतली, मात्र काहीजण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी, अनेक ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर पक्षाचेच अपक्ष बंडखोर रिंगणात उरले आहेत. आता या बंडखोरांना अनौपचारीकरित्या निवडणुकीतून बाजूला करून भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न ‘ऑपरेशन समर्थन’ अंतर्गत केला जाणार आहे.


महसूलमंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “आम्ही शेवटपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता माघारीचे सर्व पर्याय संपले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची नाराजी आणि राग स्वाभाविक आहे. प्रत्येक इच्छुकाला तिकीट देणे शक्य नाही. आता झाले ते झाले विसरून, रिंगणात असलेल्या अधिकृत उमेदवारांचे समर्थन मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांची समजूत काढू.”
चंद्रपुरात उमेदवार यादी परस्पर बदलली


चंद्रपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी परस्पर बदलल्याप्रकरणी भाजपने जिल्हाध्यक्षांवर कठोर कारवाई केली आहे. त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, “भाजपने ज्यांना उमेदवारी दिली आहे, ते शंभर टक्के निवडून येतील. मी स्वतः त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. सर्वांची समजूत काढली जाईल. आता तिकीटाचा विषय संपला आहे. भाजपचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.”



मित्रपक्षांविरोधातील लढतीचा महायुतीवर परिणाम नाही


राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होत असली तरी याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, “मित्रपक्षांच्या विरोधात लढलो तरी महायुतीत कुठलेही मतभेद होणार नाहीत. समन्वय समितीच्या बैठकीत हे ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर टीका टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आतापर्यंतच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्ष किंवा नेत्यावर टीका केलेली नाही.”

Comments
Add Comment

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

Lock Upp 2 Winner : अँड द 'लॉक अप 2' ट्रॉफी गोज टू...; नाव ऐकताच मंचावर सन्नाटा

केवळ 7 मतांनी मारली बाजी! श्रेया कालराने जिंकली लॉक अप 2ची ट्रॉफी मुंबई : 'लॉक अप 2' या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा ग्रँड

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलच्या नव्या दरांची यादी जाहीर! 'या' शहरांमध्ये बदलले दर

सरकारी तेल कंपन्यांनी 6 ऑगस्टसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या