अचानक शेअर बाजार का उसळतोय? बँक निर्देशांकातील रेकॉर्डब्रेक उच्चांकामुळे का आणखी काही? वाचा

मोहित सोमण: आज शेअर बाजारात अचानक आणखी तेजी झाल्यामुळे शेअर बाजाराने जबरदस्त उसळी घेतली आहे. ज्यामुळे सेन्सेक्स ५०० अंकाने व निफ्टी १७० अंकाने उसळल्याचे आज दिवसभरात पहायला मिळाले आहे. त्यामुळे आज सेन्सेक्सने दुपारी १.१६ वाजेपर्यंत ८५६५८.३३ पातळीवर वाढ झाली असून निफ्टीने आज २६३०० पातळी ओलांडली असून २६३१० पातळीवर व्यवहार करत आहे. ज्या कारणासाठी आज रॅली झाली आहे ते म्हणजे बँक निर्देशांकातील झालेली तुफान वाढ असून बँक निफ्टीने आज नवा उच्चांक (All time High) गाठला आहे. बँकिंग व वित्तीय शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल वाढल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली. परिणामी सेन्सेक्स बँक दुपारी १.१९ वाजेपर्यंत ५१२.४५ अंकावर उसळला असून निफ्टी बँक निफ्टी ४०७.२५ अंकांने उसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स बँक व निफ्टी बँक निर्देशांक अनुक्रमे ६७४२२.३० व निफ्टी ६०११६.७० पातळीवर व्यवहार करत आहेत.


वाढलेल्या व्हॉल्यूमचा परिणाम म्हणून बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाल्याने बँक निफ्टीने ६०११८.१० ही सर्वोच्च पातळी आज नोंदवली आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ होत असताना जागतिक तेजीच्या संकेतातील जोरावर व आगामी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीसह ऑटो शेअर्समध्ये वाढलेल्या तेजीचा फायदा म्हणून बँक निर्देशांकात तुफान वाढ झाली आहे. मुख्य प्रवाहातील बँका म्हणजे अँक्सिस बँक वगळता एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, पीएनबी बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एयु स्मॉल फायनान्स बँक,येस बँक, इंडसइंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया इत्यादी अनेक बँकेत आज मोठी वाढ झाली आहे. अर्थातच इतर निर्देशांकात बाजारातील व्यवहारात फारशी वाढ विश्लेषकांना अपेक्षित नसताना वाढत्या बँकिंग खरेदी कलामुळे आज बाजाराचे चित्र पालटले आहे.


गेल्या काही दिवसांपासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १.६ लाख कोटींची रोख गुंतवणूक विक्री भारतीय बाजारातून केली ज्याचा आणखी फटका सध्याच्या अस्थिर शेअर बाजारात बसला होता. आता तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर होणार असल्याने व तज्ञांच्या मते कंपनीच्या वाढीत मोठी सकारात्मकता दिसत असल्याने आणखी फायदा आगामी काळात अपेक्षित आहेच परंतु भूराजकीय अस्थिरतेचाही धोका तितकाच बाजारात कायम दिसतो.


काल झालेल्या जीएसटी संकलनात रेकॉर्ड ब्रेक वाढीनंतर जीएसटी कपातीसह आरबीआयच्या रेपो दरात कपात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बँकेच्या लोन बुक मध्ये वाढ झाल्याची शक्यता असताना गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजाराला प्रतिसाद दिला आहे. व्यापक निर्देशांकातील निफ्टी ऑटो निर्देशांक १% पेक्षा अधिक पातळीवर उसळल्याचा अधिकचा फायदा बाजारात दिसत आहे.


बाजारपेठेतील विक्रीतील क्रमांक १ कंपनी मारुती सुझुकीने विक्रीत २२% वाढ नोंदवली असून महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने बाजारातील हिश्श्याच्या बाबतीत ह्युंदाई मोटर इंडियाला मागे टाकले असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कमोडिटी बाजारातील वाढ होत असताना अस्थिरता कायम असताना २०२५ मधील दमदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा निर्देशांकात तेजी वाढली आहे. आज सकाळच्या सत्रात स्पॉट सोन्याचा दर विचारात घेतल्यास १.५% वाढून ४,३७८.७५ डॉलर प्रति औंस झाला तर फेब्रुवारी डिलिव्हरीसाठीच्या यूएस सोन्याच्या वायदा भावात १.२% वाढ होऊन तो ४३९२.२० डॉलर प्रति औंस झाला होता ज्याचाही फायदा बाजारात विशेषतः मेटल शेअर्समध्ये दिसत आहे. दुसरीकडे युएस डॉलर तुलनेत रूपयांची किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे बाजाराला एक प्रकारचा आधार मिळाला आहे. याशिवाय आयटी स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात स्थिरता दिसत आहे ज्यात आयटी शेअर्समधील वाढीमुळे आयटी शेअर्समध्ये झालेल्या तोटा मर्यादित राहिला आहे. सकाळी किरकोळ घसरलेला निफ्टी आयटी निर्देशांक थोड्या वेळापूर्वी किरकोळ प्रमाणात वाढला. एकूणच त्यामुळे बँकिंग वित्तीय शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात मोठी वाढ झाली आहे जे गुंतवणूकदारांच्या औत्सुक्याचे प्रतिक आहे.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत