उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार


नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले पौर्णिमेचे चंद्रदर्शन घडणार आहे. या दिवशी वर्षातील पहिला सुपरमून असेल. तो इतर पौर्णिमेपेक्षा खूप मोठा असेल. याला वुल्फ मून असेही म्हणतात. विशेष म्हणजे, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार असल्याने तो 'सुपरमून'च्या रूपात अवकाशात तळपताना दिसेल. स्वच्छ आकाश असल्यास संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल.


सामान्य पौर्णिमेच्या साधारण १४% मोठा!


हा केवळ २०२६ चा पहिलाच पूर्ण चंद्र नसेल, तर वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असणार आहे. या दिवशी चंद्र त्याच्या कक्षेतील पृथ्वीपासूनच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल. त्यामुळे तो सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा साधारण १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसेल.


भारतीय प्रमाणवेळेनुसार ३ जानेवारी रोजी दुपारी ३:३३ वाजता चंद्र पूर्णत्वास पोहोचेल. मात्र, भारतात याचे खरे विलोभनीय रूप सूर्यास्तानंतर, म्हणजेच चंद्रोदयाच्या वेळी पाहायला मिळेल. २ आणि ३ जानेवारीच्या संध्याकाळी चंद्र पूर्व क्षितिजावर नेहमीपेक्षा थोडा खाली दिसेल. यामुळे उगवणारा चंद्र आकाराने मोठा, अधिक सोनेरी आणि पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यासारखा वाटतो. भारतात संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास हा सुपरमून दिसू लागेल आणि रात्रभर आकाशात प्रकाशमान असेल.


स्वच्छ आकाश असल्यास, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरु यांसारख्या शहरांसह संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या