Mumbai Crime... मुंबईत खळबळ! न्यू इअर पार्टी साठी घरी बोलावून, गर्लफ्रेंडने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टलाच...

मुंबई : मुंबईत नववर्षाच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ पूर्व येथील कालिना परिसरात एका महिलेने रागाच्या भरात आपल्या प्रियकरावर अमानुष हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत ४४ वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


जखमी व्यक्तीचे नाव जोगिंदर लखन महतो असून ते खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते जांभळीपाडा परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जोगिंदर यांचे त्यांच्या बहिणीच्या नणंदेसोबत कंचनदेवी राकेश महतो हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते.


कंचन ही जोगिंदर यांच्यावर पत्नीला सोडून आपल्यासोबत राहावे आणि लग्न करावे, असा दबाव टाकत होती. यामुळे जोगिंदर यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने नोव्हेंबर २०२५ मध्ये जोगिंदर मुंबई सोडून बिहारला गेले होते. मात्र, त्या काळातही कंचन सतत फोन करून मुंबईत परत येण्याची आणि लग्न करण्याची धमकी देत असल्याचा आरोप जोगिंदर यांनी केला आहे.


१९ डिसेंबर २०२५ रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतले होते. त्यांनी कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे दीडच्या सुमारास कंचनने नववर्षानिमित्त मिठाई देण्याच्या बहाण्याने जोगिंदर यांना आपल्या घरी बोलावले. त्या वेळी घरात कंचन आणि तिची दोन लहान मुले उपस्थित होती.


मुले झोपल्यानंतर कंचनने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने जोगिंदर यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जोगिंदर गंभीर जखमी झाले. रक्तस्त्राव होत असतानाच त्यांनी कसेबसे घरी पोहोचून संपूर्ण प्रकार कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने प्रथम देसाई रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.


 घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. जोगिंदर यांच्या तक्रारीवरून आरोपी कंचनदेवी महतो हिच्याविरोधात गंभीर दुखापत केल्याचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Corporator Tejinder Singh Tiwana : जनसेवेचा आदर्श! नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय

- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठी मुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन.

CSKvsRR : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने चेन्नई विरोधात राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित

पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान; फडणवीस-शिंदे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई : गेल्या काही दिवसांपासून

यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात