‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई


नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा नियमितपणे जाणवणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींवर सुरुवातीला घरगुती उपचार केले जातात. पण स्थिती अधिक बिघडल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. परंतु आता अशा नियमित तक्रारींवर हमखास घेतल्या जाणाऱ्या किंवा डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाणाऱ्या एका औषधावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधाचं १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या मर्यादेतच या औषधाचं सेवन करता येईल, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.


कोणत्या औषधाच्या सेवनावर निर्बंध?


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार निमेस्युलाईड (Nimesulide) या घटकाची १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मात्रा असणाऱ्या सर्व औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. “निमेस्युलाईडचं प्रमाण १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असणाऱ्या औषधांचं सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो याबाबत केंद्र सरकारची खात्री पटली आहे. या औषधांना पर्यायी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे जनहितार्थ निमेस्युलाईडचं १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण असणारी औषधं निर्माण करणं, विक्री करणं किंवा वितरित करणं यावर बंदी घालण्यात येत आहे”, असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.


निमेस्युलाईड वर बंदी घालण्याची शिफारस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च अर्थात आयसीएमआर नं केंद्र सरकारला केली होती. या औषधामुळे यकृतामध्ये इन्फेक्शन होत असल्याची काही प्रकरणं समोर आली होती. यासंदर्भात आयसीएमआरनं केलेल्या शिफारशी केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेकडून मान्य करण्यात आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.


याशिवाय, आयसीएमआरनं निमेस्युलाईडचा वापर कोणत्या परिस्थितींमध्ये करण्यास परवानगी असेल, याबाबतही नियमावली दिली आहे. जेव्हा इतर सर्व प्रकारची औषधं निष्प्रभ ठरली असतील, तेव्हाच शेवटचा पर्याय म्हणून निमेस्युलाईडचा वापर केला जावा असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. शिवाय, अशा प्रकरणात गर्भवती, बाळंतीण माता किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या मातांना हे औषध दिलं जाऊ नये, असंही आयसीएमआरनं स्पष्ट केलं आहे. शिवाय, यकृताचा आजार असणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ नये. तसेच, पर्याय नसताना हे औषध देण्याची वेळ आली तरी १२ वर्षांखालील मुलांना हे औषध दिलं जाऊ नये, असंही आयसीएमआरनं स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

Bullet Train : "बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या' मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ