Friday, January 2, 2026

नववर्षाच्या पार्टीदरम्यान बारमधील भीषण स्फोटात ४० ठार, १०० जखमी

नववर्षाच्या पार्टीदरम्यान बारमधील भीषण स्फोटात ४० ठार, १०० जखमी

स्वित्झर्लंडच्या आलिशान ‘स्की रिसॉर्ट’मध्ये दुर्घटना

स्वित्झर्लंड: स्वित्झर्लंडमधील क्रॅन्स-मोंटाना या शहरातील आलिशान ‘स्की रिसॉर्ट’मध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान ‘ले कॉन्स्टेलेशन’ नावाच्या बारमध्ये हा स्फोट रात्री सुमारे १.३० वाजता झाला. अचानक झालेल्या स्फोटानंतर (एक किंवा अधिक स्फोट) भीषण आग लागली. या दुर्घटनेत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी बारमध्ये १०० हून अधिक जण उपस्थित होते. बार साधारणतः

रात्री २ वाजेपर्यंत खुला असतो आणि त्याची क्षमता सुमारे ४०० लोकांची आहे. बारच्या तळघरात स्फोट झाला व त्यानंतर आग लागली. कॉन्सर्टदरम्यान वापरण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी याबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.

क्रॅन्स-मोंटानावर ‘नो-फ्लाय झोन’ : सध्या या प्रकरणात गुन्हेगारी कृत्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. अपघाती कारणाची शक्यता नाकारण्यात आलेली नसली तरी स्फोट आणि आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर नागरिकांसाठी बंद केला असून क्रॅन्स-मोंटानावर ‘नो-फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे. रात्री हेलिकॉप्टरचा आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

२०१२ मधील दुर्घटनेशी तुलना

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या असून अनेक रुग्णवाहिका आणि एअर-ग्लेशियर्स हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेनंतर बराच वेळ बारच्या बाहेर रुग्णवाहिका उभ्या होत्या. काचा फुटलेल्या दिसत होत्या आणि परिसरात जळण्याचा वास पसरलेला होता, असे स्थानिक माध्यमांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >