चक्क प्रतिस्पर्ध्याचा खाऊन टाकला एबी फॉर्म; शिवसेना उमेदवारावर गुन्हा दाखल

पुणे : सध्या पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी असताना मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षातील उमेदवारांनी ३० डिसेंबरला अर्ज भरले.परंतु पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (अ)मध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादातून चक्क एका उमेदवारानं प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ल्याची घटना घडली आहे.हा प्रकार अर्ज भरणे असताना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.


बुधवारी दुपारी २ अडीच च्या सुमारास धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज भरणं प्रक्रिया सुरू होती.प्रभाग क्रमांक ३६ (अ) प्रभागात शिवसेना पक्षाकडून चुकून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले.यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला.या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला.त्यांनी हा फॉर्म फाडून गिळून टाकला .या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्यामुळे उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस वेळेवर घटनास्थळी पोहचल्यामुळे परीस्थिति ही सावरता आली.लोकसेवकाच्या कामकाजात अडथळा आणल्यानं उद्धव कांबळे यावर गुन्हा दाखल झाला आहे.


जाणून घेऊया काय आहे 'ए' फॉर्मचे महत्त्व?


प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला जातो.तोच अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाकडून ग्राह्य धरला जातो. हा अर्ज मिळवण्यासाठी अनेक उमेदवार पक्षाकडं मोठी मोर्चेबांधणी आणि शक्तीप्रदर्शन करतात. पहिला 'ए' अर्जात एखाद्या राजकीय पक्षातर्फे अधिकृत उमेदवाराचं नाव, राष्ट्रीयत्व, जात, त्याचं आणि कुटुंबीयांचं उत्पन्न, उमेदवार विरोधात दाखल गुन्हे, खटले यांचा तपशील नमूद केलेला असतो. या 'ए' अर्जावर पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी आवश्यक असते.


काय आहे 'बी' फॉर्मचे महत्त्व?


'बी' अर्जामध्ये अधिकृत उमेदवाराची माहिती, पक्षाची माहिती, तो राष्ट्रीय आहे का स्थानिक? याबाबतचा तपशीलासह पक्ष चिन्हाचा उल्लेख असतो. त्याचबरोबर अधिकृत उमेदवाराची माहितीसह अन्य पर्यायी उमेदवाराची माहिती त्यात नमूद केलेली असते. निवडणूक लढवताना पहिल्या अधिकृत उमेदवाराची अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर, 'बी' अर्जावर दिलेल्या दुसरा उमेदवार अधिकृत म्हणून नोंदवण्याकरिता अर्जात माहिती नमूद केलेली असते. या अर्जावरही पक्षाचा शिक्का, अध्यक्ष किंवा सचिवांची स्वाक्षरी असते.

Comments
Add Comment

RSS Chief Mohan Bhagwat : मोहन भागवत अमेरिकेत दाखल; न्यूयॉर्कमध्ये ५ हजार जणांच्या मेळाव्याला करणार संबोधन

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात दाखल झाले.

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावली कार्यकारिणीची तातडीची बैठक

- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे