कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रविंद्र चव्हाण यांची विजयी घोडदौड सुरुच; आणखी दोनजण बिनविरोध विजयी

कल्याण: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केली आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे बिनविरोध हॅट्रीक केली होती. आज भाजपचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.


पॅनल क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे, पॅनल क्रमांक १८ (अ) मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक २६ बी मधून रंजना मितेश पेणकर या तीन उमेदवारांच्या विजयामुळे डोंबिवलीमध्ये काल विजयाची हॅट्रीक झाली. आजही दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले आहे. कल्याण डोंबिवलीच्या पॅनल २७ (अ) मधून मंदा सुभाष पाटील आणि क्रमांक २४ (ब) मधून ज्योती पवन पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे.



कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. यासर्व जागांपैकी ५ जागांवर आतापर्यंत भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून