New Year Celebrations : 'नवे वर्ष' ठरले काळरात्र! स्वित्झर्लंडच्या पबमध्ये भीषण स्फोट अन् आग; तब्बल 'इतक्या' जणांचा मृत्यू...थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

क्रान्स-माँटाना : जगभरात २०२६ च्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच स्वित्झर्लंडमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. क्रान्स-माँटाना शहरातील प्रसिद्ध 'ले कॉन्स्टेलेशन' (Le Constellation) या बारमध्ये नवीन वर्षाच्या पार्टी दरम्यान भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.



नेमकी घटना काय?




मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत या पबमध्ये पर्यटकांची आणि स्थानिकांची प्रचंड गर्दी होती. मध्यरात्री १.३० च्या सुमारास, जेव्हा लोक उत्सवाच्या धुंदीत होते, तेव्हा अचानक एका जोरदार स्फोटाने हा परिसर हादरला. स्फोट इतका भीषण होता की काही सेकंदातच संपूर्ण पबला आगीने वेढले. कोणालाही सावरण्याची किंवा बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, परिणामी पबमध्ये एकच धावपळ आणि किंकाळ्या ऐकू आल्या.



मृतांची संख्या आणि बचावकार्य


या भीषण आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर बरीच लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



आगीचे कारण अस्पष्ट


हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाला की गॅस गळतीमुळे, याचा तपास स्विस पोलीस करत आहेत. 'ले कॉन्स्टेलेशन' हा बार शहरातील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने तिथे सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, याचीही चौकशी केली जात आहे. या घटनेचे अत्यंत भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आनंदात असलेल्या अनेक कुटुंबांवर या दुर्घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये अनेक परदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

क्रुरपणे मारहाण अन् नंतर पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न! बांगलादेशात आणखी एका हिंदूवर हल्ला

ढाका: मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने

किरिबाटी , न्यूझीलंडसह अनेक देशांत नववर्षाच जोरदार स्वागत

हैदराबाद : सगळीकडे नवीन वर्षाच स्वागत हे जोरदार करण्यात आले.त्यामध्ये किरिबाटी या देशात भारतीय प्रमाणवेळेनुसार

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल

सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा