आयटीआय परिसरात बिबट्या असल्याचा संशय

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वनविभागाचे आवाहन


रोहा : नागोठणे येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याच वावर असल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र वनविभागाने केलेल्या सखोल तपासणीनंतर हे दावे फेटाळून लावत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.


भविष्यातील अशा घटनांची शहानिशा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आता प्रकर्षाने दिसत आहे. नागोठणे येथील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षन प्राचार्यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी वन विभागाला एक पत्र लिहिले होते. या पत्रात नमूद करण्यात आले होते की, संस्थेच्या परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हेतर बिबट्याच्या पायांचे ठसे असल्याचा दावाही करण्यात आला होता. या परिसरात सुमारे चारशे ते साडेचारशे प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले होते. वनविभागाने प्राचार्यांच्या विनंतीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी नागोठणे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी तातडीने बचाव पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. सागर दहिवेकर आणि त्यांच्या पथकाने आयटीआय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची आणि त्यांनी दाखवलेल्या ठशांची सूक्ष्म तपासानंतर ते ठसे मुळातच बिबट्याचे किंवा कोणत्या इतर हिंसक प्राण्याचे नव्हते. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती केवल एक अफवा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वन विभागाने प्रशासकाला लेखी स्वरूपात कळविले की, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू नयेत, जर भविष्यात कोणताही वन्यप्राणी खरोखर दिसून आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सुचित केले आहे. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा मुंबई : महायुती सरकारमध्ये

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे