CBDT Tax Collection Update: डिसेंबर महिन्यात कर संकलनात ८% वाढ

मोहित सोमण: आयकर विभागाने (Central Board of Direct Taxes CBDT) डिसेंबर महिन्यातील आयकर संकलनाची नवी माहिती प्रसिद्ध केली आहे. नव्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर कर संकलनात (Tax Collection) मध्ये ८% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील १५७८४३२.५१ कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत एकूण कर संकलनात १७०४७२५.२१ कोटी रुपयांवर वाढ झाल्याने स्पष्ट झाले तर एकूण अ‍ॅडव्हान्स कर संकलनात (Advance Tax Collection) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ४.२७% वाढ झाली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, अ‍ॅडव्हान्स करापैकी कॉर्पोरेट करात नोव्हेंबर महिन्यातील डिसेंबरमध्ये वाढ कायम असताना विना कॉर्पोरेट (Non Corporate Tax NCT) करात घसरण झाल्याचे सरकारने म्हटले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कॉर्पोरेट कर संकलन ५६२४२२.१८ कोटीवर होते जे आर्थिक वर्ष २०२५-२६ डिसेंबरमध्ये ६०७२९९.९९ कोटींवर वाढले. तर विना कॉर्पोरेट कर संकलन आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील १९२६५६.४० कोटींच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८१०८७.९३ कोटींवर घसरले आहे ज्यामध्ये आकडेवारीनुसार -६.४९% घसरण झाली आहे.


आकडेवारीनुसार कर परताव्यात (Tax Refunds) मात्र डिसेंबर पर्यंत मोठी घसरण झाली आहे. कॉर्पोरेट करातील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये असलेल्या १८५४६०.५५ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात (२०२५-२६) १७७२६७.५३ कोटींवर घसरण झाली. विना कॉर्पोरेट क्षेत्रातील कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबर २०२३-२४ मधील १५७९९३.१३ कोटी तुलनेत ११९२६७.५३ कोटींवर घसरण झाली. एकूण स्थूल कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ४.१६% घसरण झाल्याचे सरकारने आकडेवारीत स्पष्ट केले आहे. ही सदर आकडेवारी १७ डिसेंबरपर्यंत असल्याचेही सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Gold-Silver Price 18 August 2026 : आनंदवार्ता! सोने - चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन भाव

मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरात

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; महाराष्ट्र शासनाच्या नियमांत महत्त्वाचा बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे