कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश मिळाले आहे. पॅनल क्रमांक २६ बी मधून भाजपच्या उमेदवार रंजना मितेश पेणकर या बिनविरोध निवडून आल्या असून, त्यामुळे शहरात भाजपाने विजयाची हॅट्रिक साधली आहे.

रंजना पेणकर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाला. उद्धव ठाकरे गट आणि मनसे आघाडीनेही या पॅनलमध्ये उमेदवार न दिल्याने पेणकर यांचा विजय निश्चित झाला.

कल्याण-डोंबिवलीत बिनविरोध निवडून येणाऱ्या पेणकर या तिसऱ्या भाजप उमेदवार ठरल्या आहेत. याआधी आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी या देखील भाजपच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. आसावरी नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून विजय मिळवला, तर रेखा चौधरी या पॅनल क्रमांक १८ (अ) मधून निवडून आल्या. नवरे यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा असून, यंदा सत्तारुढ भाजप-शिवसेना युती निवडणूक लढवत आहे. यामध्ये शिवसेना ६६ तर भाजप ५६ जागांवर निवडणुकीत उतरली आहे. महायुतीतून बाहेर पडलेला अजित पवार गट ४२ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.

सत्तारुढ युतीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आघाडीचे आव्हान आहे. या आघाडीत उबाठा गट ६८ तर मनसे ५४ जागांवर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, सत्तारुढ आणि विरोधी आघाडीत बंडखोरीचे सावट दिसत असून, नाराज उमेदवारांची मनधरणी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच सर्व प्रभागांतील चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

Iran-US-Israel War : इराणने केली पाकिस्तानची कोंडी; पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखले

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज २७वा दिवस असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स