बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ साठी दोन हजार ५१६ अर्ज दाखल

काल अंतिम दिनी म्हणजे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल


नामनिर्देशपपत्र सादर करण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत एकूण मिळून २ हजार ५१६ अर्ज दाखल


आज बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी


छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध होणार


मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी म्‍हणजेच काल मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल दाखल झाले आहेत. तर, नामनिर्देशपपत्र सादर करण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत म्‍हणजे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण मिळून २ हजार ५१६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. आज बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली. त्‍यानुसार, मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ यावेळेत नामनिर्देशनपत्रांचे वितरण तर, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्‍वीकारण्‍यात आली.


नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी म्‍हणजेच काल मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. तर, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ५९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्‍यात आले आहे.


मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण मिळून ११ हजार ३९१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. तर, काल अखेर एकूण मिळून २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.


प्रशासकीय विभाग / वितरण केलेले नामनिर्देशन पत्र संख्‍या/ आज प्राप्‍त नामनिर्देशन पत्रे/ आजअखेर एकूण प्राप्‍त नामनिर्देशन पत्रे याची माहिती पुढीलप्रमाणे -


१) ए + बी + ई विभाग (RO २३) - ४५ / ११८ / १५० प्राप्‍त


२) सी + डी विभाग (RO २२) - २० / ५० / ५८ प्राप्‍त


3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) - ०८ / ६४/ ७५ प्राप्‍त


४) जी दक्षिण विभाग (RO २०) - ३५ / ७७ / ८६ प्राप्‍त


५) जी उत्‍तर विभाग (RO १९) - ३३ / ११३ / १३७ प्राप्‍त


६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) - ४० / १०५ / ११८ प्राप्‍त


७) एल विभाग (RO १७) - २१ / १०१ / ११६ प्राप्‍त


८) एल विभाग (RO १६) - ३४ / ९१ / १११ प्राप्‍त


९) एम पूर्व विभाग (RO १५) - ३७ / १५८ / १८२ प्राप्‍त


१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) - ६१ / १५२/ १६४ प्राप्‍त


११) एन विभाग (RO १३) - २० / ९७ / १२३ प्राप्‍त


१२) एस विभाग (RO १२) - ३९ / ११५ / १२५ प्राप्‍त


१३) टी विभाग (RO ११) - ३० / ८८ / १०९ प्राप्‍त


१४) एच पूर्व विभाग (RO १०) - २६ / १०६ / १२५ प्राप्‍त


१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) - १६ / ८५ / ९३ प्राप्‍त


१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) - ० / ८३ / १०४ प्राप्‍त


१७) के पश्चिम विभाग (RO ७) - २७ / १०४ / १३३ प्राप्‍त


१८) पी दक्षिण विभाग (RO ६) - १६ / ६९ / ८१ प्राप्‍त


१९) पी पूर्व विभाग (RO ५) - २८ / ९८ / ११७ प्राप्‍त


२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) - ०७ / ५९ / ८९ प्राप्‍त


२१) आर दक्षिण विभाग (RO ३) - १८ / ९५ / १०९ प्राप्‍त


२२) आर मध्‍य विभाग (RO २) - ११ / ४७ / ५१ प्राप्‍त


२३) आर उत्‍तर विभाग (RO १) - २२ / ४७ / ६० प्राप्‍त


एकूण – वितरित ५९४ / २१२२ / २५१६ प्राप्‍त


Comments
Add Comment

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Iran-US-Israel War : इराणचा मोठा दावा! अमेरिकेच्या शक्तिशाली ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आरोप

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा दावा करत सांगितले आहे की, त्यांनी

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर