२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार


मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, ८९३ प्रभागांमधील २ हजार ८६९ जागांसाठी तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक जागेवर सरासरी ११.७१ उमेदवार रिंगणात आहेत.


या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पुणे महानगरपालिकेत दिसून येत आहे. पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ३ हजार १७९ अर्ज दाखल झाले असून, प्रति जागा सरासरी १९.२७ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्याच्या जवळपास नाशिक महानगरपालिकेतही तीव्र स्पर्धा आहे. नाशिकमध्ये २ हजार ३५६ अर्ज प्राप्त झाले असून, प्रति जागा सरासरी १९.३१ उमेदवार मैदानात आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ८७० अर्ज दाखल झाले असून, एका जागेवर सरासरी १६.२६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जालना महानगरपालिकेत एका सर्वाधिक स्पर्धा दिसून येते आहे. येथे ६५ जागांसाठी १ हजार २६० अर्ज आले असून, प्रति प्रभाग अर्जाचे प्रमाण सरासरी १९.३८ उमेदवार इतके आहे.


दुसरीकडे, काही महानगरपालिकांमध्ये स्पर्धा तुलनेने कमी आहे. पनवेल महानगरपालिकेत ७८ जागांसाठी केवळ ३९१ अर्ज प्राप्त झाले असून, प्रति जागा सरासरी केवळ ५.०१ उमेदवार रिंगणात आहेत. इचलकरंजी (४५६ अर्ज) आणि मिरा-भाईंदर (६३२ अर्ज) येथेही कमी उमेदवार मैदानात आहेत.

मुंबईत काय स्थिती?


मुंबईतील २२७ जागांसाठी २ हजार ५१६ अर्ज दाखल झाले आहेत. यातील तब्बल २ हजार १२२ अर्ज शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर २०२५) दाखल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पक्षांतर्गत जागावाटपाच्या चर्चा शेवटपर्यंत सुरू होत्या, त्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. येथे प्रत्येक प्रभागात सरासरी ११ उमेदवार रिंगणात आहेत.


कुठे किती अर्ज?


- पुणे : ३,१७९ (सर्वाधिक)
- मुंबई : २,५१६
- नाशिक : २,३५६
- पिंपरी-चिंचवड : १,९९३
- छत्रपती संभाजीनगर : १,८७०
- पनवेल : ३९१ (सर्वात कमी)

२ जानेवारीला चित्र स्पष्ट होणार


निवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज माघारीची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे बंडखोरी केलेले किती जण अर्ज माघारी घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बंडोबांना थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोअर टीम कामाला लागली असून, प्रमुख महानगरपालिकांमध्ये समविचारी उमेदवारांमध्ये कमीत कमी लढत व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे