‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट


सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर गुन्हेगारांनी आता 'शुभेच्छांच्या' नावाखाली नागरिकांना लुटण्याचे नवे जाळे विणले आहे. व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर येणारे 'हॅप्पी न्यू इयर'चे मेसेज तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारू शकतात, असा इशारा देत सफाळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सायबर गुन्हेगार सध्या व्हॉट्सॲप, एसएमएस आणि फेसबुकवर आकर्षक शुभेच्छांचे मेसेज पाठवत आहेत. यामध्ये 'फ्री गिफ्ट', 'बक्षीस' किंवा 'डिस्काउंट कूपन'चे आमिष दाखवून एक लिंक दिली जाते.

या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये घातक 'मालवेअर' किंवा व्हायरस इन्स्टॉल होतो. याद्वारे गुन्हेगार तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊन तुमची वैयक्तिक माहिती, ओटीपी आणि बँकिंग डिटेल्स चोरून खाते रिकामे करत आहेत.

पोलिसांकडून 'या' खबरदारीच्या सूचना :

  •  अनोळखी लिंक टाळा: व्हॉट्सॲॅपवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

  •  अॅप्स डाऊनलोड करू नका: मेसेजद्वारे पाठवलेले कोणतेही APK किंवा फाईल्स डाऊनलोड करू नका. केवळ अधिकृत 'Play Store' चाच वापर करा.

  •  गोपनीय माहिती शेअर करू नका: बँक कधीही फोनवर किंवा लिंकद्वारे पिन किंवा ओटीपी मागत नाही, हे लक्षात ठेवा.

  •  सॉफ्टवेअर अपडेट ठेवा: आपल्या मोबाईलचे सिक्युरिटी सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.

Comments
Add Comment

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारची कर्मचाऱ्यांचे पगार दणदणीत वाढणार वेतन आयोगाकडे 'या' मोठ्या शिफारशी

प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

Shocking Case in Lucknow : पत्नीला तलाक पाहिजे होता म्हणून पतीला...लखनऊमधील विचित्र घटना

लखनऊ : उतर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे. एका महिलेने पतीकडून घटस्फोट मिळवता यावा

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे