नायलॉन मांजा विकणाऱ्याला अडीच लाखांचा दंड ?

उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; ५ जानेवारीच्या सुनावणीकडे लक्ष


नाशिक : नायलॉन मांजाचा वापर हा मानवी, पशू-पक्ष्यांच्या जीवासाठी अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाच्या वापरावर व विक्रीवर कठोर निर्बंध घालण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याबाबत व्यापक जनजागृती व कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक नागरिक जखमी होत असून काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये मृत्यू ही झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता, नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले.


नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास थेट ५० हजारांचा दंड व विक्री किंवा साठवणूक केल्याचे समोर आल्यास अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या प्रस्तावित कारवाईविरोधात कोणास हरकत किंवा म्हणणे मांडायचे असल्यास, त्यांनी पुढील सुनावणीच्या दिवशी, म्हणजेच ५जानेवारी, २०२६ रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे. जर कोणीही न्यायालयात हजर राहून हरकत मांडली नाही, तर सार्वजनिकरीत्या या दंडात्मक कारवाईस कोणाचीही हरकत नाही, असे गृहीत धरले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


नायलॉन मांजावरील बंदीबाबत न्यायालयीन आदेशांची माहिती असूनही काही नागरिक व विक्रेते त्याचे उल्लंघन करीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत, नायलॉन मांजाचा वापर करणारे तसेच त्याची विक्री करणारे यांना थेट जबाबदार धरले जावे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार, अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास त्याच्या पालकांवर ५० हजार रुपये दंड, तर प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास त्याच्यावर ५० हजार रुपये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, खंडपीठाच्या आदेशानंतर नंदूरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही सार्वजनिक सूचना दिली असून, नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्री केल्यास संबंधित व्यक्ती कायदेशीर व आर्थिक परिणामांना पूर्णतः जबाबदार राहील, असे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ

शहराध्यक्षांच्या गाडीचा फिल्मी पाठलाग; अखेर पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वितरण मयूर बारागजे  सिडको : महापालिका

वेगवान बहिरी ससाणा नांदूर मधमेश्वर अभयारण्यात!

ताशी २९० किमीचा वेग नाशिक : हवेत अविश्वसनीय वेगाने झेपावणारा, पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान म्हणून ओळखला जाणारा

नाशिक २०२७ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटींची मंजुरी

नाशिक शहरातील द्वारका चौक होणार वाहतूक कोंडी मुक्त शहर नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव

मनमाड-कसारा, कसारा-मुंबई मार्गावर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनला केंद्राकडून मंजुरी

तांत्रिक अडथळे दूर होणार; खा. राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश नाशिक : नाशिक तसेच उत्तर

सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार

सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७००