निवणुकीपूर्वीच महायुतीला झटका: वॉर्डातून २ उमेदवार बाद

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मतदानाआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ या दोन महत्त्वाच्या प्रभागांत महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने या दोन्ही जागा अक्षरशः हातातून निसटल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाद झाल्यामुळे या वॉर्डमध्ये महायुतीला माघार घ्यावी लागली असून, याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होणार आहे.


वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील असल्याने भाजपने येथे विशेष तयारी केली होती. मात्र उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाच्या छाननीत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. परिणामी या प्रभागात कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना दिसणार नाही.


दरम्यान, वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये घडलेल्या घटनेने महायुतीची अडचण अधिकच वाढवली. या वॉर्डमधून भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही मिळाला होता. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार वेळ संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज थेट बाद ठरवण्यात आला.


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड निर्णायक ठरणार असताना, दोन प्रभागांमध्ये उमेदवारच नसणे ही महायुतीसाठी नामुष्की मानली जात आहे.आता या दोन वॉर्डमधील महायुतीचे मतदार कोणत्या दिशेने मतदान करतात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९