मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५ अंकाने घसरण झाली आहे. त्यामुळे सुरूवातीच्या कलात निफ्टी २६२०० व सेन्सेक्स ८४८०० पातळी राखण्यास अपयशी झाला आहे. जागतिक अस्थिरतेचे लोण आजही शेअर बाजारात कायम राहिल्याने त्याचा गुंतवणूकदारांना फटका जाणवत आहे. एकीकडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन यांच्यातील वाद ९५% सुटला असून दुसरीकडे त्यांनी बल्क आर्मचा साठा व अण्वस्त्र कार्यक्रमासाठी बंदी घालण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे शेअर बाजारात कमोडिटी बाजारासह आजही गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास अपेक्षित आहे. आज वर्षातील शेवटची निफ्टी एक्सपायरी असल्याने ती बाजारातील तेजीवरही प्रभावी घटक म्हणून काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील श्रेत्रीय विशेष कामगिरी निर्णायक ठरू शकते. दरम्यान मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये होत असलेली घसरणही एक आजची नकारात्मक बाजू असेल. आज मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात नफा बुकिंग होण्याची शक्यता असून बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची कामगिरी बाजारात महत्वाची ठरणार आहे.
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात पाहिल्यास क्षेत्रीय निर्देशांकात वाढ केवळ मेटल शेअर्समध्ये झाली असून उर्वरित शेअर्समध्ये घसरण झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक घसरण पीएसयु बँक, मिडिया, रियल्टी, हेल्थकेअर निर्देशांकात झाली आहे. व्यापक निर्देशांकातही सकाळी संपूर्णतः घसरण झाली असून सर्वाधिक घसरण स्मॉलकॅप २५०,स्मॉलकॅप १००, मायक्रोकॅप २५० निर्देशांकात झाली आहे. आशियाई बाजारातही आज घसरणीचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असून युएस बाजारातील ए आय शेअर्समध्ये झालेल्या कालच्या घसरणीनंतर आशियाई बाजारातही हा कल सकाळी कायम राहिला आहे. सर्वाधिक घसरण निकेयी २२५, जकार्ता कंपोझिट गिफ्ट निफ्टीत झाली असून वाढ सेट कंपोझिट, स्ट्रेट टाईम्स, हेंगसेंग निर्देशांकात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ अलोक इंडस्ट्रीज (५.४१%), अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर (२.४६%), ग्राफाईट इंडिया (२.३७%), क्लीन सायन्स (२.०८%), लुपिन (२.६०%), आयनॉक्स इंडिया (२.००%), श्याम मेटालिक्स (१.९०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एमएमटीसी (४.००%), जीएमडीसी (३.४१%), ज्युपिटर वॅगन्स (२.५८%), पीबी फिनटेक (२.२३%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.१६%), ग्राफ्राईट इंडिया (२.०८%), असाही इंडिया (१.८८%), होनसा कंज्यूमर (१.८६%) समभागात झाली आहे.