वसई-विरारमध्ये आघाडीचा निर्णय गुलदस्त्यातच!

तिन्ही राजकीय पक्षांचे धोरण आज स्पष्ट होणार


विरार : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (दि. ३०) रोजी शेवटचा दिवस आहे. असे असतानाही बविआ, शिवसेना (उबाठा ) आणि काँग्रेस या राजकीय पक्षांची आघाडी झाल्याचा निर्णय झालेला नाही. अपेक्षित जागा न मिळणे आणि निवडणूक चिन्हावर एकमत न झाल्याने आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडल्याचे उबाठा पालघर जिल्हा सरचिटणीस विलास पोतनीस यांनी जाहीर केले होते. मात्र रविवार आणि सोमवारीसुद्धा उबाठा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बविआच्या नेत्यांकडे आघाडी बाबत चर्चा केली. त्यामुळे आता आघाडी की स्वबळावर हा विषय मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.
वसई - विरार महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता केवळ एक दिवस शिल्लक असताना अजूनही शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि बविआ यांच्यातील आघाडीचा निर्णय झाला नाही. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे, तर बविआ, काँगेस, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची तयारी चालवली होती. यासाठी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. कोणत्या राजकीय पक्षाकडे किती जागा असतील यापासून सुरू झालेली चर्चा निवडणूक चिन्हावर आली. बहुजन विकास आघाडीने आपल्या पारंपरिक शिट्टी या चिन्हावरच आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला. मनसे आणि काँग्रेस पक्षाने बविआ सोबत जाण्याचे निश्चित केले होते. मात्र चिन्ह आणि जागा याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश काँग्रेसवर सोपविला होता. उबाठाचे चिन्हावर आणि जागावाटपात एकमत झाले नाही. त्यामुळे त्यांनी आघाडीतून बाहेर पडल्याचे पोतनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारांनी स्वबळानुसार निवडणूक अर्ज सुद्धा दाखल केले आहेत. मनसे मात्र शिट्टी या चिन्हावर लढण्यास तयार आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा उबाठा गटातर्फे बहुजन विकास आघाडीशी दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सोमवारी उशिरापर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे बविआचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा आघाडी आणि जागा वाटपाबाबत बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता अखेरच्या दिवशीच या तीन राजकीय पक्षांमधील आघाडी आणि जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे हे स्पष्ट झालेले आहे.


भाजप सेना युतीच्या उमेदवारांबाबत गोपनीयता : भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या कोणत्याही नेत्याकडून प्रत्यक्षात कोणता पक्ष किती जागा लढवत आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट केले नाही. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात येणाऱ्या उमेदवारांना खासगीमध्ये निरोप देण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सतत तीन दिवस वसई-विरारमध्ये तळ ठोकून उमेदवारांच्या भेटी घेतल्या. तसेच नाराज असलेल्या इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना ए फॉर्म दिले आहेत, तर उद्या दुपारी भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच बी फार्म जोडले जाणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा कोण आहेत ही बाब स्पष्ट झालेली नाही.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावली कार्यकारिणीची तातडीची बैठक

- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आतापर्यंत साडेबारा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दहा हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र

DCM Eknath Shinde : कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; आतापर्यंत १० हजार कोटींची मदत

मुंबई : शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत असून,