नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट'


घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट


जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या स्वागताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.काश्मीरच्या संपूर्ण प्रदेशात पोलीस, केंद्रीय सुरक्षा बल (सीआरपीएफ) आणि सैन्याच्या संयुक्त पथकांनी पाहणी सुरू केली असून सुरक्षा वाढविण्यासाठी उच्च अलर्ट लागू करण्यात आला आहे. सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी एरिया डोमिनेशन व सर्च ऑपरेशन्स अधिक गतिमान केले आहेत.


श्रीनगरसह घाटीतील संवेदनशील भागांमध्ये स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी ) सह समन्वय साधून तलाशी अभियान जोरात चालू आहे. पोलिसांनी संशयित ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीची मालिका सुरू केली असून शहरी भागात चेकपॉइंट्स लावून तिथे तपासणी सुरू आहे. नववर्षाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवरही सुरक्षा वाढवण्यात आली. गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगर येथे पर्यटकांची गर्दी असून डल लेक आणि आसपासच्या परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर