मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार


मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारी २०२६ पासून बदलणार आहेत. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार असलेल्या रेल्वे वेळापत्रकामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळेत पाच ते पंधरा मिनिटांचा फरक पडणार आहे. अनेक गाड्यांच्या वेळा अलीकडे किंवा पलीकडे करण्यात आल्या आहेत.


मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या वेळापत्रकात काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि तांत्रिक सुधारणांमुळे हा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना नव्या वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.


वंदे भारत एक्सप्रेस, इंटरसिटी, सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या प्रमुख गाड्यांच्या वेळांमध्ये थोडा बदल होणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईत सकाळी पोहोचतात किंवा रात्री सुटतात, त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि वेळेत रेल्वेने बदल केला आहे. हे बदल जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाला निघण्याआधी 'NTES' (National Train Enquiry System) या ॲपवर किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. वेळापत्रकातील बदल हा रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठीच असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


Comments
Add Comment

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष