Tuesday, December 30, 2025

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारी २०२६ पासून बदलणार आहेत. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार असलेल्या रेल्वे वेळापत्रकामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळेत पाच ते पंधरा मिनिटांचा फरक पडणार आहे. अनेक गाड्यांच्या वेळा अलीकडे किंवा पलीकडे करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या वेळापत्रकात काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि तांत्रिक सुधारणांमुळे हा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना नव्या वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस, इंटरसिटी, सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या प्रमुख गाड्यांच्या वेळांमध्ये थोडा बदल होणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईत सकाळी पोहोचतात किंवा रात्री सुटतात, त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि वेळेत रेल्वेने बदल केला आहे. हे बदल जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाला निघण्याआधी 'NTES' (National Train Enquiry System) या ॲपवर किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. वेळापत्रकातील बदल हा रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठीच असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा